Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: खाजगी शाळेची शैक्षणिक फी माफ न झाल्यास तीव्र आंदोलन - राजु झोडे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
२०२०-२१-२२ मधील खाजगी शाळांची शैक्षणिक फी पूर्णपणे माफ करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी रमेश निषाद - आमचा विदर्भ प्रतिनिधी बल्लारपूर - माग...

  • २०२०-२१-२२ मधील खाजगी शाळांची शैक्षणिक फी पूर्णपणे माफ करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी
रमेश निषाद - आमचा विदर्भ प्रतिनिधी
बल्लारपूर -
मागील दोन वर्षीपासून कोरोना महामारीमुळे‌ सर्व शाळा महाविद्यालये बंद आहेत. कोरोनामुळे सर्वसामान्य जनतेच्या हाताला काम नसल्यामुळे पालकवर्ग आर्थिक डबघाईस आलेला आहे. अशा या महामारीच्या काळात खाजगी शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या पालकांकडून मोठ्या प्रमाणात शैक्षणिक शुल्क च्या नावाने आर्थिक वसुली करत आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांना धमकावून तुमच्या मुलांना परीक्षेला बसू देणार नाही असे सांगून फी वसूल करण्याचे काम करत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून विद्यार्थी शाळेत जात नसताना पालकांकडून अवैद्य भी वसुलीचे काम बंद करून संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे या मागणीला घेऊन वंचित बहुजन आघाडी द्वारा शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

कोरोना काळात दोन वर्षापासून शाळा बंद असून शाळांना कोणत्याही प्रकारचा खर्च नाही तरीसुद्धा खाजगी शाळा फी च्या नावाने पालकांना नेहमी त्रास देत असतात.शाळांनी कोणत्याही प्रकारची सेवा पुरवली नसताना पालकांनी फी देण्याचा प्रश्नच येत नाही. फक्त ऑनलाइन क्लासेसच्या नावाने संपूर्ण फी घेणे हे चुकीचे आहे. खाजगी शाळांनी अवैद्य  शुल्काच्या नावाने पालकांची फसवणूक करू नये व तात्काळ पूर्ण फी माफ करावी याकरिता वंचित बहुजन आघाडी द्वारा शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली.

२०२०-२१-२२ या सत्रातील संपूर्ण फी खाजगी शाळांकडून माफ करण्यात आली नाही तर वंचित बहुजन आघाडी द्वारा या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचित चे नेते राजू झोडे यांनी प्रशासनाला दिला. निवेदन देतांना वंचित चे नेते राजू झोडे, जिल्हा महासचिव जयदीप खोब्रागडे, शहर अध्यक्ष बंडू ढेंगरे, महिला जिल्हाध्यक्ष कविताताई गौरकर, शहर अध्यक्ष तनुजाताई रायपूरे, लताताई साव रामजी जुनघरे, अविकान्त नरळ, प्रमोद रणदिवे, सोनू भुक्कया, कृष्णा पेरकावार, ईसरायल चेपूवार व असंख्य पालक, कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या अधिक आहेत....

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top