Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ग्रामपंचायत मध्ये निकृष्ट दर्जाचे कामे ; प्रशासनाचे दुर्लक्ष
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जिवती शिवसेना महिला संघटीका सिंधुताई जाधव यांचा आरोप धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदुर - अतिदुर्गम व अशिक्षित समजला जाणारा ज...
  • जिवती शिवसेना महिला संघटीका सिंधुताई जाधव यांचा आरोप
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदुर -
अतिदुर्गम व अशिक्षित समजला जाणारा जिवती तालुक्यातील टेकामांडवा ग्रामपंचायत मध्ये प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजने अंतर्गत गावापासून ते श्री भिंगेवाड यांच्या शेतापर्यंत पांदन रस्त्याचे बांधकाम २५ जून २०२१ ला पूर्ण झाले मात्र एकाच महिन्यात पांदन रस्ता चोरीला गेला. यामुळे गाव विकासाला चालना मिळत नाही आहे असे चित्र ग्रामपंचायत टेकामांडवा येथे दिसून येत आहे.
शासनाचा पैसा हा सर्वसामान्य माणसाच्या घामातुन उभा होतो, यातून होणारी विकासकामे दर्जेदारच असली पाहिजे. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजने अंतर्गत टेकामांडवा ग्रामपंचायत मध्ये गावापासून ते श्री भिंगेवाड यांच्या शेतापर्यंत पांदन रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाच झालं आहे. विकासकामाला विरोध नाही. मात्र निकृष्टदर्जाची कामे का म्हणून खपवून घ्यायची. ग्राम विकासासाठी आम्ही सोबत आहोत मात्र शासनाच्या पैशाचा योग्य विनियोग होतं नसेल तर व अशा कामाची चौकशी अधिकारी करीत नसेल तर वेळप्रसंगी आंदोलन करु मात्र ग्राम पंचायत टेकामांडवा येथील निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी झाल्याशिवाय शांत बसणार नाही. असा खणखणीत इशारा शिवसेना महिला संघटीका तालुका जिवती सिंधुताई जाधव यांनी दिला आहे.

बातम्या अधिक आहेत.....
⭕ वेकोलिने नाले आपसात जोडल्याने गोवरी गावात व शेतशिवारात पूर सदृश्य स्थिती - बबनभाऊ उरकुडे ⭕ ३०० एकरच्या वर शेती व २५० च्या वर घरे आली होती पाण्याखाली ⭕ वेकोलीविरुद्ध मोठा एल्गार - गावकरी जनआंदोलनाच्या तयारीत ⭕ खदान परिसरात सामूहिक आत्मदहनाचा इशारा ⭕ पूर ओसरला, डोळे मात्र ओलेच ◼️ वाचा सविस्तर... बघा व्हिडीओ.... 👇




About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top