Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोरोना महामारीमुळे रद्द झालेल्या पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू करा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
इंटरसिटी एक्स्प्रेस रेल्वे गाडीचा थांबा विरुर रेल्वे स्टेशनला द्या माजी आमदार अँड संजय धोटे यांची रेल्वे व कोळसा राज्यमंत्री ना.रावसाहेब पाट...
  • इंटरसिटी एक्स्प्रेस रेल्वे गाडीचा थांबा विरुर रेल्वे स्टेशनला द्या
  • माजी आमदार अँड संजय धोटे यांची रेल्वे व कोळसा राज्यमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांच्या कडे पत्राद्वारे मागणी
विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील तेलंगणा सिमेच्या जवळ असलेल विरुर स्टेशन हे गांव, या गावाभोवती अनेक गावाचा संपर्क असून येथील गावालगत अनेक अनेक गावाचा समावेश होतो,विरुर येथे रेल्वे स्टेशन अस्तित्वात असून कोरोना महामारीमुळे या रुळावरून धावणाऱ्या सर्व पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. या रुळावरून जाणाऱ्या गाड्या या स्टेशन वर थांबत नसल्यामुळे विरुर तसेच परिसरातील नागरिकांना यांचा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर जाणाऱ्या रेल्वे रामगिरी पॅसेंजर, भाग्यनगर पॅसेंजर तसेच अजनी पॅसेंजर या रेल्वे गाड्या या मार्गावर धावत असून काही महिन्यापासून या सर्व पॅसेंजर गाड्या बंद आहे. तरी या सर्व गाड्या लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. 

याअडचणी संदर्भात ही बाब येथील नागरिकांनी माजी आमदार अँड.संजय धोटे यांच्या लक्षात आणून दिली. पॅसेंजर रेल्वे गाड्याचा थांबा विरुर रेल्वे स्टेशन येथे देण्यात यावा या संदर्भात माजी आमदार अँड संजय धोटे यांनी केंद्रीय रेल्वे व कोळसा राज्यमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे पत्राद्वारे माहिती देताना सांगितले की, विरुर स्टेशन येथील नागरिकांना सुरू झाल्यास येथील उद्योग वर्गांना तसेच व्यापारी बांधवाना यांचा फायदा होईल तसेच पॅसेंजर चालू झाल्यास याचा नागरिकांना कमी पैश्यात प्रवास करता येईल व प्रवास सुखद राहील,माजी आमदार अँड संजय धोटे यांनी ना.रावसाहेब दानवे पाटील यांच्या कडे पॅसेंजर रेल्वे गाड्याची माहिती देताना सांगितले, की भाग्यनगर पॅसेंजर गाडी नंबर 17233 ही गाडी सिकंदराबाद ते बल्लारपूर व गाडी नंबर 17234 ही गाडी बल्लारपूर ते सिकंदराबाद ही गाडी रोज या मार्गावर धावत असते. तसेच रामगिरी पॅसेंजर गाडी नंबर 57121 ही गाडी काजीपेठ ते बल्लारपूर व गाडी नंबर 57124 ही गाडी बल्लारपूर ते काजीपेठ या मार्गावर धावत असते व अजनी पॅसेंजर गाडी नंबर 57135 ही गाडी काजीपेठ ते अजनी व गाडी नंबर 57136 अजनी ते काजीपेठ ही गाडी सुद्धा या मार्गावर नेहमीत धावत असते तसेच इंटरसिटी एक्स्प्रेस गाडी नंबर 02771 ही गाडी सिकंदराबाद ते रायपूर व गाडी नंबर 02772 ही गाडी रायपूर ते सिकंदराबाद रोज विरुर स्टेशन रुळावरून धावत असते या गाडीचा थांबा विरुर रेल्वे स्टेशन येथे दिल्यास येथील नागरिकांना सोयीस्कर होईल. या सर्व गाड्या विरुर रेल्वे स्टेशन येथे सुरू झाल्यास येथील नागरिकांना मोठा फायदा होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. जनतेची मागणी लक्षात घेता या सर्व पॅसेंजर रेल्वे गाड्या व इंटरसिटी एक्स्प्रेसचा थांबा देण्याकरिता रेल्वे राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे पत्राद्वारे मागणी करून माजी आमदार अँड संजय धोटे यांनी विनंती केली आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top