Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: बल्लारपूरमध्ये अनेक महिलांनी ‘आप’ मध्ये प्रवेश घेतला
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विरेंद्र पुणेकर- आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - गुरुवारी २२ जुलै रोजी बल्लारपूर शहरात आम आदमी पार्टी महिला महा सम्मेलन आयोजित करण्यात...


विरेंद्र पुणेकर- आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -

गुरुवारी २२ जुलै रोजी बल्लारपूर शहरात आम आदमी पार्टी महिला महा सम्मेलन आयोजित करण्यात आले होते, मुसळधार पाऊस पडल्यानंतर ही महिलांनी उपस्थिती नोंदविली आणि 37 महिलांनी ‘आप’ पार्टी मध्ये प्रवेश केला, क्रांतिकारक महिलांचे पदाधिकाऱ्यांन तर्फे स्वागत करण्यात आले. आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी पक्षाचे कार्य अधिक बळकट करण्याचे आश्वासन दिले, कार्यक्रमास प्रमुख अतिथींमध्ये महाराष्ट्र राज्य युवा आघाडीचे अध्यक्ष कृतल आकरे, महाराष्ट्र राज्य आय टी सेल चे सह-सचिव अशोक शर्मा, नागपूर जिल्हाध्यक्ष कविता सिंगल, नागपूर संघठण मंत्री शंकर इंगोले, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, जिल्हा उपाध्यक्ष हुमायूं अली, जिल्हा सचिव संतोष दोरखंडे, जिल्हा कोषाध्यक्ष भीवराज सोनी, जिल्हा विधि सल्लागार ऍड. किशोर पुसलवार आणि जिल्हा संघटनमंत्री राजेश बेले याच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी बल्लारपूर शहराचे अध्यक्ष रविभाऊ पुपलवार, उपाध्यक्ष अफझल अली, सचिव ऍड. पवन वैरागडे, कोषाध्यक्ष आसिफ शेख, संघटना मंत्री निलेश जाधव, वाहूक आघाडीचे प्रमुख अवदेश तिवारी, कृषी आघाडीचे प्रमुख सुदाकर गेडाम, युवा सचिव उमेश काकडे, ज्योती बाबरे, प्रियंका करुणाकर, मीना केशकर, देवा अम्मा, नसीमा शेख, रितिका, समशेरसिंह चौहान, राकेश वडस्कर, प्रशांत गद्दाला, इरशाद अली, आदर्श नारायणदास, कृष्णा मिश्रा, आशिष फुलझाले,सुमित ताकसांडे, संजू भाऊ, अझीम शेख आदी उपस्थित होते.


Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top