Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: बाबूपेठ परिसरात वाटमारी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मोबाईल हिसकावत युवकाला मारहाण शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - बाबूपेठ परिसरात 4 जुलैला दोन लोकांनी मिळून वाटमारी केल्याची घटना ...

  • मोबाईल हिसकावत युवकाला मारहाण
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
बाबूपेठ परिसरात 4 जुलैला दोन लोकांनी मिळून वाटमारी केल्याची घटना उजेडात आली आले आहे. दोन लोकांनी फिर्यादीला थांबवून त्याला मारहाण करत त्याचा जवळ असलेला रेडमी कंपनीचा मोबाईल हिसकावल्याची तक्रार पोलिसांना मिळताच पोलिसांनी जलदगतीने तपासाचे सूत्र फिरवितात मुद्देमाला सह दोन आरोपीना अटक करण्यात आली. 

फिर्यादीच्या तक्रारीनंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांच्या मार्गदर्शनात पोउपनि वाघमारे व कोरडे यांनी या घटनेचा तपास केला असता यामध्ये साहिल कुमार सिंह वय 24 व रोहित लक्ष्मण कोमटी वय 22 यांना अटक करण्यात आली. आरोपिकडून फिर्यादीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून एक दुचाकी 50 हजार असा एकूण 66 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी अपराध क्रमांक 521/21 कलम 392, 34 अनव्ये गुन्हा दाखल केला असून सदर आरोपींचा अजून काही गुन्ह्यात समावेश आहे का याचा तपास सुरू आहे. सदर कारवाई पोलीस कर्मचारी विलास निकाडे व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केली. 

बातम्या अधिक आहेत.....

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top