Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: व्यापाऱ्यांकरिता स्वतंत्र लसीकरण केंद्र मंजूर करावे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आ. सुधीर मुनगंटीवार व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन येणाऱ्या एक-दोन दिवसात लसीकरण केंद्र सुरू होण्याची शक्यता फेडरेशन ऑफ ट्रेड कॉमर्स अँड इंडस्‍ट...

  • आ. सुधीर मुनगंटीवार व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
  • येणाऱ्या एक-दोन दिवसात लसीकरण केंद्र सुरू होण्याची शक्यता
  • फेडरेशन ऑफ ट्रेड कॉमर्स अँड इंडस्‍ट्रीजने केली मागणी
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -

जिल्ह्यातील लॉकडाऊन संपले असून सकाळी ७ ते सायंकाळी ५ अशी आता व्यापार करण्याकरिता मुभा देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने संपूर्ण बाजारपेठ खुली झाली असून अश्या स्थितीत व्यापारी बंधू "सुपर स्प्रेडर" ठरू नये म्हणून काळजी घेण्याची गरज आहे. महानगरात व्यापाऱ्यासाठी दोन स्वतंत्र केंन्द्राची व्यवस्था करावी अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनच्या माध्यमाने फेडरेशन ऑफ ट्रेड कॉमर्स अँड इंडस्‍ट्रीजने केली.  

यासंदर्भातील निवेदन फेडरेशन ऑफ ट्रेड कॉमर्स अँड इंडस्‍ट्रीजतर्फे आ. मुनगंटीवार यांना प्राप्‍त झाल्‍यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी प्रत्‍यक्ष भेट घेवून सांगितले कि, कोरोनाशी लढा देण्‍यासाठी लसीकरण ही काळाची गरज झाली आहे. लसीकरणाचे विविध टप्‍पे सुरू असताना मध्‍यंतरी या प्रक्रियेमध्‍ये व्‍यत्‍यय निर्माण झाला होता, परंतु आता मोठया प्रमाणावर कोरोना लस उपलब्‍ध झाली आहे. लॉकडाऊन संपल्‍यामुळे पुन्‍हा कोरोनाचा संसर्ग बाजारपेठेतुन होवू शकतो. अशा स्थितीत व्‍यापारी बंधूं, त्यांचे कुटुंबीय व त्यांच्या अधिनस्थ काम करणारे कर्मचारी यांचे लसीकरण करणे आवश्‍यक आहे. हे लसीकरण यथाशिघ्र करण्‍यात यावे अशी मागणी केली. व्यापाऱ्यांसाठी दोन स्‍वतंत्र केंद्र उपलब्‍ध करून द्याव्‍या अशाही सुचना केली. यावेळी फेडरेशन ऑफ ट्रेड कॉमर्स अँड इंडस्‍ट्रीजचे अध्‍यक्ष रामकिशोर सारडा व माजी अध्‍यक्ष संतोष चिल्‍लरवार, भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे प्रामुख्याने उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top