Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: बचत गटातील महिलांनी तयार केली रोपवाटिका
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर रोपवाटिकाचे जिप सभापती सुनील उरकुडे यांचे हस्ते उदघाटन आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - राज्याच्...

  • पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर रोपवाटिकाचे जिप सभापती सुनील उरकुडे यांचे हस्ते उदघाटन
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
राज्याच्या कृषी विभागामार्फत विकेल ते पिकेल या अभियाना अंतर्गत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजनाही शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकाचे व्यावसायिक पद्धतीने लागवड करून उत्पादन घेतले पाहिजे असे प्रतिपादन जिप कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे यांनी केले.

महिला बचत गटाच्या महिलांनी रोपवाटिका उभारण्याचा निर्धार करून दोन लाखाच्या अधिक क्षमतेची वाटिका चे काम पूर्णत्वास आणले. सदर वाटीकेत उच्च प्रतीचे रोपे तयार करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे व त्यात निरंतरता कायम ठेवावी त्यासाठी हवी ती मदत करायला प्रशासन सज्ज असेल असेही याप्रसंगी सुनील उरकुडे यांनी अधिक माहिती देतांना सांगितले.

राष्ट्रीय कृषी विभाग योजनेअंतर्गत राजुरा तालुक्यातील पंचाळा येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका निसर्ग शेतकरी महिला बचत गट यांनी सुंदर अशी रोपवाटिका तयार केली. या रोपवाटीकेचे ऊद्घाटन  जिप कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे यांचे हस्ते नुकतेच संपन्न झाले. याप्रसंगी माजी आमदार निमकर, पंस माजी सभापती व विद्यमान पंस सदस्य सौ. कुंदाताई जेनेकर, उपविभागीय कृषि अधिकारी मोरे साहेब, तालुका कृषी अधिकारी मकपल्ले साहेब, चूनाळाचे उपसरपंच बाळनाथ वडस्कर, चनाखाचे उपसरपंच विकास देवाडकर, पंचाळाचे उपसरपंच आकाश चोथले, भाजपा नेते भाऊराव चंदनखेडे, लक्ष्मण निरांजने, विहरगांवचे माजी उपसरपंच ईर्शाद शेख व निसर्ग शेतकरी महिला बचत गटाच्या सदस्या व गावकरी उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top