- पेट्रोल, डिझेल, गॅस वाढीव किंमती त्वरित कमी करण्याची मागणी
कोरपना -
कोरपना तालुक्यातील विदर्भ राज्य आंदोलन समितीने पेट्रोल, डिझेल, गॅस यांच्या वाढीव किंमती त्वरित कमी करण्याच्या संदर्भात तहसीलदार कोरपना यांना निवेदन दिले. पेट्रोल, डिझेल, गॅस यांनी त्यांचे वाढलेले भाव त्वरित कमी केले पाहिजेत कारण वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत कोरोना साथीच्या लॉकडाऊनमुळे जनतेचा रोजगार हरवला होता, व्यवसाय कमी झाला होता, बेरोजगारी वाढल्यामुळे वाढ झाली होती. उद्योग, लोकांचे उत्पन्न कमी झाले. अशा त्रासाच्या वेळी केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किंमतीत सातत्याने वाढ केली आहे, यामुळे देशांतर्गत खर्च वाढला, उत्पादनाच्या खर्चामध्ये वाढ झाली, परिणामी महागाई वाढत गेली. या साथीच्या परिस्थितीत पेट्रोल, डिझेल, गॅस आणि इतर महागाईच्या वाढीव किंमती त्वरित मागे घ्याव्यात यासाठी विदर्भ राज्य संग समिती यांनी कोरपना तहसीलदार यांच्यामार्फत पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी, पेट्रोलियम मंत्री यांना निवेदन देण्यात आलेत या वाढलेल्या किमती या सरकारने तात्काळ कमी करण्यात यावे या सामान्य जनतेची होणारी लूट ही तात्काळ थांबविण्यातयावी याबाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी अरुण पाटील नवले, निळकंठराव कोरांगे, रमाकांत मालेकर, मदन पाटील सातपुते, अविनाश मुसळे, प्रवीण ठाकरे, बंडू राजूरकर, अनंता घोडे, श्रीनिवास मुसळे, विनायक फुलके, सुभाष सुरडकर आदीं उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.