- अग्निसदनिका, शोकसभा सदनिका, नवीन बोरवेल, मोक्षधामकडे जाणारा रास्ता, सौंदर्यीकरण, तलावाच्या खोलीकरणाची मागणी
राजुरा -
राजुरा ला लागून असलेल्या बामणवाडा ग्राम पंचायत येथील स्मशानभूमीची दैनावस्था झालेली आहे. बामणवाडा येथील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नवीन वस्त्या वाढत असल्यामुळे लोकसंख्येत भर पडत आहे. सदर स्मशानभूमी वरील अंतीमसंस्कार सदनिका टिनाच्या शेडची असल्यामुडे ती जीर्ण झालेली आहे व व वादळ-वाऱ्या मूळे सदनिकेवरचे टिनाचे पत्रे उडून गेले आहे व जे टिनाचे पत्रे आहे ते सुद्धा जीर्ण होऊन भोके पडलेले व फाटलेले आहे. त्यामुळे पावसामध्ये एखाद्या मैयत व्यक्तीचा अंतीमसंस्कार करणे जिकिरीचे जात आहे. सदर स्मशानभूमी मधील बोरवेल कित्तेक दिवसापासून बंद आहे. मैयत व्यक्तीची शोक सभा घेण्यासाठी सदनिका नाही उन्हाळ्यात सावलीत उभे रहातो म्हटलं तर तिथे झाडे सुद्धा नाही. त्याकरिता स्मशानभूमी मध्ये नवीन अग्निदहन सदनिका, शोकसभा सदनिका, पाण्यासाठी बोरवेल दुरुस्त वाल कंपाऊंड, स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रोड व तलावाचे सौंदर्यीकरण इत्यादी विकास कामे करण्यासाठी 30 लाखाचा निधी विविध योजनेतून मिळण्यासाठी पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार मा.खासदार बाळू धानोरकर, मा.आमदार सुभाष धोटे यांचे कडे विद्यमान ग्राम पंचायत सदस्य तथा माजी सरपंच श्री सर्वानंद वाघमारे यांनी मागणी केली आहे. सदर मोक्षधाम मध्ये सौंदर्यीकरण व वृक्ष लावण्याचे काम सर्वानंद वाघमारे व वृक्षप्रेमी भास्कर करमनकर करीत आहे
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.