प्रत्येक व्यक्तीने वृक्षारोपणास सहकार्य केल्यास वाढते कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण काही प्रमाणात कमी होऊन ऑक्सीजनचे प्रमाण वाढण्यास नक्कीच मदत होईल. पर्यावरण विषयी जनजागृती करण्यासाठी सभा, संमेलने, चर्चासत्र, सामुहिक वृक्षारोपण अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे गरजेचे आहे. झाडे आपणास ऑक्सिजन निःशुल्क देतात त्या ऑक्सिजन साठी कोरोना संकटात आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागले. ऑक्सिजन मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांचा लागलेल्या लांबच लांब रांगा. टँकर, रेल्वे, एवढेच नव्हे तर विमानाने ऑक्सिजन आयात करण्यासाठी करावी लागलेली कसरत, आपण सर्वांनीच पाहिली आहे. ऑक्सिजन अभावी असे हाल होत असतानाही विकासाच्या नावावर आपण आपणास निःशुल्क ऑक्सीजन देणाऱ्या वृक्षांचा खुलेआम कुऱ्हाड चालवून बळी घेत आहोत. पर्यावरणाचे पर्यायाने आपले फार मोठे नुकसाननही करून घेत आहोत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे यशस्वी संगोपन करणे काळाची गरज आहे. यासाठी अल्ट्राटेक सिमेंट आवाळपूर F टाईप कॉलनी लगत खुल्या जागेत अल्ट्राटेक सिमेंट चे युनिट हेड मा. विजय एकरे यांनी स्वतः झाड लावून पर्यावरण दिवसाचे महत्त्व सांगितले. यावेळी फंक्शनल हेड संदीप देशमुख, सर्व विभागाचे HOD आणि सेक्शन हेड उपस्थित होते. सगळ्यांनी एक-एक वृक्षांचे रोपण करून पर्यावरण दिन उत्साहात साजरा करत पर्यावरण रक्षणा मध्ये आपला सहभाग नोंदविला. याप्रसंगी आवाळपूर सिमेंट कंपनीतील अधिकारी, कर्मचारी व कामगार प्रामुख्याने उपस्थित होते.
अल्ट्राटेक सिमेंट आवाळपूर येथे जागतिक पर्यावरण दिन वृक्षारोपण करून साजरा
गडचांदूर -
प्रत्येक माणसांमध्ये पर्यावरण विषयी जनजागृती करणे आणि प्रत्येकाने पर्यावरणाबाबत पुढाकार घेणे या उद्देशाने दरवर्षी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून सर्वत्र साजरा केल्या जातो.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.