Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: देवतारी त्याला कोण मारी! 6 वर्षाच्या चिमुकल्यावर पडली विद्यूत तार पण...
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चिमुकल्यावर पडली ११ केव्हीची विद्यूत तार चिमुकला मृत्यूच्या दाढेतून सुखरूप परतला रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी यवतमाळ - नशीब बलवत्तर अ...

  • चिमुकल्यावर पडली ११ केव्हीची विद्यूत तार
  • चिमुकला मृत्यूच्या दाढेतून सुखरूप परतला
रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी
यवतमाळ -

नशीब बलवत्तर असेल तर मृत्यूही दोन पावलं मागे सरतो ही म्हण आपण ऐकलीच असेल. असाच एक प्रकार यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील फुलसावंगी इथं घडला आहे. ११ केव्हीची तार तुटल्यामुळे एका सहा वर्षाच्या मुलाचा अपघात झाला पण मृत्यूच्या दाढेतून तो सुखरूप परतला आहे.

गजानन विनायक भोजने असं 6 वर्षीय चिमुकल्याचं नाव आहे. संध्याकाळच्या सुमारास लहान मुलं खेळत असताना अचानक 11 केव्हीचा हाय होलटेजचा तार तुटली आणि चक्क गजानन जेथून जात होता त्या ठिकाणी पडला. विधुत तार तुटून जमिनीवर पडताच एकच स्फोट झाला आणि भीषण आग लागली.

याच ताराच्या तावडीत 6 वर्षीय गजानन सापडला होता, पण दैव बलवत्तर म्हणून तारांचा गुंडाळा झाला आणि गजानन जमिनीवर पडला. यावेळी काही तरुणांनी गजाननला रिंगणातून ओढून बाहेर काढलं. सुदैवाने इतक्या मोठ्या अपघातून गजानन बचावला. पण त्याचा उजव्या हातावर आणि पायावर भाजल्यामुळे गंभीर जखमा झाल्या असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, ज्या ठिकाणाहून ११ केव्हीची तार गेली आहे तिथे भरगच्च वस्ती आहे. या हायव्होलटेज विद्युत तार अनेक ठिकाणी जॉईन्ट आहेत. हायव्होलटेज विद्यूत तार अनेक ठिकाणी जॉईन्ट असल्याने हा अपघात घडल्याचे नागरिकांनकडून बोललं जात आहे. 








Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top