Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: थोर स्वतंत्र सेनानी जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त माजी आमदार अँड संजय धोटे यांनी वाहली श्रद्धांजली
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अनंता गोखरे - उपसंपादक राजुरा - भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय जनता पार्टी जनसंपर...


अनंता गोखरे - उपसंपादक
राजुरा -
भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय राजुरा येथे माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या हस्ते डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी प्रतिमेचे पूजन करून तसेच पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केले व त्यांना नमन केले. 

यावेळी बोलताना माजी आमदार अँड संजय धोटे म्हणाले की डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी हे जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष मनुन आपली छाप पाडली व जनसंघाला शिखरावर नेण्याचे योगदान दिले, नेहमी आपल्या वाणीतून मनत एक देश मे दो प्रधान,दो विधान, और दो निशाण नही चलेगे असे म्हणणारे डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी  याना नमन करून पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे, जिल्हा उपाध्यक्ष विनायक देशमुख, सुरेश रागीट, भाजपा जिल्हा कार्यकरणी सदस्य संजय उपगनलावार, भाजपा तालुका महामंत्री दिलीप वांढरे ,भाजपा नेते महादेव तपासे, भाजयुमो तालुका महामंत्री रवि बुरडकर, जनार्दन निकोडे, संदीप मडावी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक बातम्या वाचा.....
पहिल्याच पावसात रामपूरचे रस्ते चिखलाने माखले ⭕ विकापासून कोसो दूर रामपूर, रामपूरला मूलभूत सुविधाच नाही

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top