- विकापासून कोसो दूर रामपूर, रामपूरला मूलभूत सुविधाच नाही
- पक्का रस्त्या देण्याची ऐपत नसेल तर कमीत कमी कच्चा रास्ता तरी द्या
- रामपूरवासीय संतापले.....
राजुरा -
पहिल्याच पावसात राजुरा शहरापासून ३ किमी अंतरावर असलेल्या रामपूर गावातील रस्त्यांची चाळण झाली आहे. या भागातील बहुतांश रस्ते सध्या ‘मरणयातना’ सोसत आहेत. काहींना काँक्रिटीकरणाचं भाग्य लाभले आहे. पण, ते रस्तेही निसरडे झाल्याने अपघातांना कारणीभूत ठरताहेत. काही भागातील रस्त्यांचे डांबरीकरण, सिमेंटीकरण केले खरे; मात्र त्यातील काही रस्त्यांची अवस्था आज दयनीय झाली आहे. विशेषत: रामपूर भागातील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. पावसाळ्याच्या जागोजागी पाणी साचल्याने मोठाल्या बाता सांगणाऱ्या लोकप्रतिनिधींचे व प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे. नवीन वसत असलेल्या वस्त्यात मूलभूत सुविधाच नाही, रामपुरातील वॉर्ड क्रमांक ३ येथील नागरिकांना तर कच्चा रस्ताही नशिबी नाही त्यामुळे तेथील नागरिकांना चिखल तुडवत ये-जा करावी लागत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आपल्या संबंधित लोकांच्या घरासमोरील काम करून इतर नागरिकांना अक्षरशः डावलताना असल्याची ओरड नागरिकांनी केली आहे. आधी लॉकडाऊन मुळे घरा बाहेर निघता येत नव्हते आता रस्त्यावर पाणी साचल्यान निघता येत नाही. पाणी साचल्याने परिसराला पुर्ण तलावाचे स्वरूप येत आहे. त्यात अनेकदा साप व इतर विषारी जीव असते. मागे विषारी जिवाने अनेकांना चावा घेतल्याने नागरिकांना संकटातून जावे लागले आहे.
लोकप्रतिनिधी व स्थानिक प्रशासनाला वारंवार सूचना, निवेदने देऊनही सुस्तावलेले जनप्रतिनिधी जाणूनबुझून तर लक्ष देत नाही आहे ना अशी शंका नागरिकात निर्माण होत आहे. वारंवार वीज जाणे-येण्याची समस्या असो कि रस्त्याची समस्या असो पुन्हा वर्षानुवर्षे थातुरमातुर उत्तरे देऊन भूलथापा देणाऱ्या लोकप्रतिनिधी व प्रशासनाची पक्का रस्त्या देण्याची ऐपत नसेल तर कमीत कमी कच्चा रास्ता तरी द्या अशी मागणी लता डकरे यांनी केली आहे. रामपूर गावातील रस्त्यांची झालेली दुरवस्था याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.