Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: 'श्र्वास पुन्हा घेण्यासाठी' लसीकरण करा - जि.प. अध्यक्षा संध्या गुरनुले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
फिनिक्स साहित्य मंचातर्फे कवितासंग्रहाचे प्रकाशन शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - जिल्ह्यातील कवी-लेखकांनी कोरोनाकाळात साहित्य ल...

  • फिनिक्स साहित्य मंचातर्फे कवितासंग्रहाचे प्रकाशन
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
जिल्ह्यातील कवी-लेखकांनी कोरोनाकाळात साहित्य लेखन करुन जनजागृती केली‌. हे खुप आशादायी आहे. या काळात प्रत्येकांनी स्वत:चे व कुटुंबाचे तसेच समाजाचे संरक्षण करावे. समाजात व्यापक प्रमाणात जनजागृतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार महत्त्वपुर्ण आहे. 'श्र्वास पुन्हा घेण्यासाठी' सर्वांनी लसीकरण करणे गरजेचे असल्याचे मत जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले यांनी व्यक्त केले.

फिनिक्स साहित्य मंच चंद्रपूर व पंचायत समीती गोंडपिंपरीच्या माध्यमाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले यांच्या मार्गदर्शनात 'श्र्वास पुन्हा घेण्यासाठी' या कोरोना लसीकरणाबाबत संदेश देणा-या प्रातिनिधिक कवितासंग्रहाचे नुकतेच त्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या उपक्रमाचे त्यांनी विशेष अभिनंदन केले. यासाठी विशेष पुढाकार घेणारे गोंडपिपरीचे सहायक गटविकास अधिकारी कवी धनंजय साळवे, फिनिक्सचे अध्यक्ष कवी नरेशकुमार बोरीकर, अविनाश पोईनकर, गोपाल शिरपूरकर यांनी 'श्वास पुन्हा घेण्यासाठी' या कोरोनाविषयक लसीकरण जनजागृतीच्या कवितांचा प्रातिनिधिक संग्रह संपादित केला. 

संदेश कोरोना लसीकरणाचा या विषयावर कविंचे आॅनलाईन कविसंमेलन घेण्यात आले. सदर कविता जनजागृतीच्या उद्देशाने पुस्तक रुपाने संपादित करण्यात आल्या. यात जिल्ह्यातील कवी सुरेंद्र इंगळे, धर्मेंद्र कनाके, जयवंत वानखडे, सुनील बावणे, संतोषकुमार उईके, विजय वाटेकर, पंडीत लोंढे, राजेंद्र घोटकर, मिलेश साकूरकर, अरुण घोरपडे, बि.सी.नगराळे, नरेंद्र कन्नाके, राजेंद्र पोईनकर, सुधाकर कन्नाके, संभाजी गावंडे यांच्या कवितांचा समावेश आहे. 

जिल्हा प्रशासनाकडून उपक्रमाचे कौतुक
कोरोना निर्मुलनासाठी जिल्ह्यातील साहित्यिकांच्या साहित्यातून जनजागृती करणा-या या उपक्रमाची जिल्हा प्रशासनाकडून विशेष दखल घेण्यात आली. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपील कलोडे, मुख्य लेखा अधिकारी अशोक मातकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राज गहलोत, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सोमनाथे, गोंडपिपरीचे गटविकास अधिकारी शेषराव बुलकुंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.हेमचंद कन्नाके  यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. सध्याच्या काळात साहित्याचा सकारात्मक उपयोग करणा-या लोकहितावह अशा उपक्रमाची गरज असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top