Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: शोकांतिका ; गावात इंग्रजांच घर असुन देखील गावाला ग्रामपंचायत नाही
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमदार संजय राठोड यांच्या मतदारसंघातील कापसी गावाला 40 वर्षी पासुन ग्रामपंचायतिची प्रतीक्षा ग्रापं नसल्याने विकासाचे वांदे रक्षक पाटील - आमचा...

  • आमदार संजय राठोड यांच्या मतदारसंघातील कापसी गावाला 40 वर्षी पासुन ग्रामपंचायतिची प्रतीक्षा
  • ग्रापं नसल्याने विकासाचे वांदे
रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी
यवतमाळ -
आमदार संजय राठोड यांच्या मतदारसंघातील 415 लोकसंख्या असलेले कापसी हे गाव विकासापासुन कोसो दुर आहे. 1981 पासून म्हणजेच 40 वर्षी पासुन आजतागायत कापसी गावाला ग्रामपंचायत नसल्याने कापसी गावचा विकास खोळंबला आहे. कापसी गावाला ग्रामपंचायत मिळण्यासाठी स्थानिक गावकऱ्यांनी वारंवार पंचायत समिती, जिल्हा परिषद यांना निवेदन व ठराव दिले. परंतु,  त्यांमधिल येत असलेल्या शासकीय त्रुट्या दुर करता करता ग्रामस्थ डबघाईस आले आहे. तरी सुद्धा ग्रामपंचायत मिळाली नाही. कापसी गावाला ग्रामपंचायत नसल्याने स्थानिक गावकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गावातील रस्ता खराब झाला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. विजेच्या खंब्यावरील लाईट. अनेक समस्या आहेत. या समस्यां दुर करण्यासाठी  प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा व कापसी गावाच्या ग्रामपंचायतीचा प्रश्न निकाली काढावा असी मागणी कापसीतील ग्रामस्थ करीत आहेत. स्थानिक आमदार संजय राठोड यांनी कापसीतील निर्माण झालेल्या समस्या दुर करण्यासाठी व कापसीला ग्रामपंचायत मिळवून देण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही त्यामुळे कापसी येथील गावकऱ्यांनी त्यांच्या प्रति तीव्र नाराजगी व्यक्त केली आहे. कापसी या गावात इग्रजांच घर सुद्धा आहे या गावामध्ये इंग्रजांचे वास्तव्य होते तरीसुद्धा ग्रामपंचायत नाही व गावचा विकास झालेला नाही. याकडे लोकप्रतिनिधीनीं व प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 







About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top