Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: निधन वार्ता - शेतकरी संघटनेचे जेष्ठ कार्यकर्ते नारायण गड्डमवार यांचे दुःखद निधन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा - शेतकरी संघटनेचे जेष्ठ कार्यकर्ते, कृषी उत्पन्न बाजार समिती राजुरा चे माजी उपसभापती, सोंडो गावचे उपसरपंच, देवाडा आदिवासी सेवा सहकारी...

राजुरा -
शेतकरी संघटनेचे जेष्ठ कार्यकर्ते, कृषी उत्पन्न बाजार समिती राजुरा चे माजी उपसभापती, सोंडो गावचे उपसरपंच, देवाडा आदिवासी सेवा सहकारी संस्थेचे सदस्य नारायणराव गड्डमवार वय ६६ यांचे दिर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली असा आप्त परिवार आहे. 

नारायणराव गड्डमवार यांच्या निधनाने शेतकरी संघटनेचे व सोंडो गावाचे आतोनात नुकसान झाले आले. हि पोकळी भरून निघणे शक्य नाही. त्यांनी सर्वसाधारण लोकांकरिता केलेले कार्य सदैव स्मरणात राहील. नारायणराव विश्वासू म्हणून ओळखले जात होते. आपला हा विश्वासू अवेळी गेला अशी भावनिक प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते अँड. वामनरावजी चटप यांनी व्यक्त केली आहे.   

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top