महाविदर्भ राज्य संघर्ष समितीचे ते नेते होते. मविसचा प्रभाव चंद्रपुरात वाढला होता. रमेशभाऊ नगरसेवक पदाचे उमेदवार होते. रमेशभाऊ भानापेठ वार्डातून निवडून आले आणि चंद्रपुर नगरपरिषदेचे अध्यक्ष बनले. त्यांनी नगरपरिषदेच्या कारभार उत्तमरीतीने चालविला. कमलनाथ केंद्रीय कोळसा मंत्री होते, वेस्टर्न कोल्ड फिल्डचे मुख्यालय नागपूरातून जबलपूरला हलविण्याचा निर्णय कोळसा मंत्रालयाने घेतला. भंडाऱ्याचे फाॅरर्वड ब्लाॅकचे नेते आणि चंद्रपूरचे महाविदर्भ संघर्ष समितीचे निवडून आलेले नगराध्यक्ष रमेश कोतपल्लीवार रामनगरमधील शासकीय विश्रामगृहात भाऊ जांबुवंतरावांना भेटले. वस्तुस्थिती सांगीतली. थेट भाऊंनी इंदिराजींना लाईटिंग काॅल लावून भेटीची वेळ व तारीख मागीतली होती.
ते नंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळले आणि या पक्षाची जिल्हाध्यक्ष पद भुषविले परंतु राजकारणातील बेबंदशाही रमेशभाऊला कधी रास आली नाही आणि भ्रष्टाचार कधी सहन झाला नाही. रमेशभाऊनी राजकारणाशी फारकत घेतली आणि साईबाबा मंदिरात आपली भक्ती अर्पित केली. नुकताच 27 एप्रिल रोजी 80वा वाढदिवस साजरा केला.
देशभरात कोरोनाचे संकट बघता आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याने केंद्र सरकारसह राज्य सरकारने मदतीचे आवाहन केले. यात श्री. रमेश एम. कोतपल्लीवार यांनी ५१ हजार रू.चा धनादेश मदत निधीकरीता दिला. मागील आठवडाभरापासून ते आजारी होते. अल्पशा आजाराने आज 3 जून रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर राखी कंचर्लावार आणि नगरसेवक संजय कंचर्लावार यांचे ते मामा होते. त्यांच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
टीम आमचा विदर्भ परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.