Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आरटीई अंतर्गत 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 11 जूनपासून
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
निवड यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश 20 दिवसांत पूर्ण करावे शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा ...

  • निवड यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश 20 दिवसांत पूर्ण करावे
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार, दरवर्षीप्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेची ऑनलाईन सोडत 7 एप्रिल 2021 रोजी  काढण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांची आरटीई अंतर्गत निवड यादीत सोडत लागली आहे, त्या पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथ) दिपेंद्र लोखंडे यांनी केले आहे.

सन 2021-22 या वर्षाची आरटीई अंतर्गत 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दि.11 जून 2021 पासून सुरू करण्यात येत आहे. तसेच निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाकरीता 20 दिवसांचा कालावधी देण्यात येत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता पालकांनी शाळेत गर्दी करू नये. शाळांनी त्यांना आरटीई पोर्टलवर जी यादी प्राप्त झाली आहे त्या यादीतील पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठीचा दिनांक आरटीई पोर्टलवर देण्यात येईल. ज्या बालकांना लॉटरी लागली आहे त्यांच्या पालकांनी मूळ कागदपत्रे व छायांकित प्रती घेऊन शाळेत आपल्या पाल्याचा तात्पुरता प्रवेश निश्चित करावा.

बरेच पालक शाळेत प्रवेश मिळावा यासाठी आरटीई प्रवेश फॉर्म भरताना चुकीचे अंतर दाखवतात. त्यामुळे रहिवासी पत्त्याचा पुरावा इत्यादी कागदपत्रांवरून शाळा व निवासी पत्त्याच्या अंतराची पडताळणी करण्यात येईल. निवड यादीतील बालकांबाबत चुकीचे अंतर दाखविल्याचे निदर्शनास आल्यास शाळेने तात्पुरता प्रवेश देऊ नये. अशा पालकांना तालुकास्तरीय समितीकडे अर्ज करता येईल. पडताळणी समितीने त्यांच्याकडे आलेले अर्ज व तक्रारीची शहानिशा करूनच प्रतीक्षा यादीतील बालकांचे प्रवेश सुरु होण्याआधी प्रवेश द्यावा किंवा देऊ नये याबाबतचा आदेश शाळांना द्यावा. त्या आदेशाप्रमाणे शाळेने कार्यवाही करावी.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व लॉकडाऊन या कारणांमुळे जे पालक प्रत्यक्षरीत्या शाळेत प्रवेशासाठी येऊ शकत नाही अशा बालकांच्या पालकांनी विहित मुदतीत दूरध्वनी, ई-मेल, व्हाट्सअॅपद्वारे शाळेत संपर्क करून प्रवेशाची कार्यवाही पूर्ण करावी. निवड यादीतील विद्यार्थ्यांचा प्रवेश घेण्याचा कालावधी संपल्यानंतर शाळांमधील रिक्त जागांवर प्रतीक्षा यादी मधील विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्राधान्य देण्यात येईल. त्याबाबत सविस्तर सूचना आरटीई पोर्टलवर दिल्या जातील.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top