Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कुठे मिळेल अर्ज ; कुठे संपर्क साधावा वाचा सविस्तर.... शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - आदिवासी समाज सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृ...

  • कुठे मिळेल अर्ज ; कुठे संपर्क साधावा वाचा सविस्तर....

शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
आदिवासी समाज सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्टय़ा अति मागासलेला असून प्रतिकूल परिस्थितीमुळे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने शासन निर्णय 31 मार्च 2005,दि.11 एप्रिल 2012 व 16 मार्च 2016 अन्वये  राज्यातील अनुसूचित जमातीच्या 10 विद्यार्थ्यांना परदेशात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात परदेशात शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी दि. 30 जून 2021 पुर्वी अर्ज करावे, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे, प्रकल्प अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.

या ठिकाणी मिळेल अर्ज:
परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज जवळच्या एकलव्य रेसिडेंशियल स्कूल, शासकीय आश्रम शाळा संलग्न कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तसेच प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,चंद्रपुर या ठिकाणी उपलब्ध आहेत.

येथे साधा संपर्क:
विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, प्रशासकीय भवन,पहिला माळा, चंद्रपूर येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top