- सोबत माना परिसराचे सौंदर्यीकरण करण्याचे सुद्धा आश्वासन
- भ्रमण मित्र मंडळाने केली होती मागणी
सकाळी मॉर्निंग वॉल्क करिता शेकडो नागरिक पठाणपुरा गेट च्या मार्गाने माना टेकडी परिसराकडे जातात. याच मार्गावर असलेल्या पंचमुखी हनुमान मंदिराच्या आवारात शेकडो नागरिक योगा-प्राणायाम करतात. प्रत्येक शनिवारी या मंदिरात भाविक महाप्रसादही ठेवतात. मंदिर लहान असल्यामुळे येथे सभागृह, पाण्याकरिता बोरवेल व स्यायंपाकगृहाची नितांत आवश्यकता भासत होती त्याकरिता आज मंदिरात आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट दिली असता भ्रमण मित्र मंडळाने त्यांना मागणी केली. लवकरच आपण यकाकरिता निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन जोरगेवार यांनी दिले. यावेळी भ्रमण मित्र मंडळाचे देविदास तपासे, अतुल देशकर, अनुप चिवंडे, विजय चहारे, राजू जोशी, रुपेश वर्मा, प्रकाश वाडगुरे, कैलास वाडगुरे, सुनील भागवत, शशी ठक्कर, अशोक नागपुरे, रुपेश शर्मा, प्रकाश रिंगणे, राजू शास्त्रकार, मनीष तिवारी, संजीव चहारे, ओम वर्मा, रवी कैलमवार, शिवणकर, नितीन बोन्डे, घनश्याम घरोटे, संदेश उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.