- विदर्भ राज्य आंदोलन समितीची मागणी
शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
कोरपना -
जिवती तालुक्यातील शेतकरी सुमारे १९४५ ते १९५० पासुन शेतकरी शेतीची मशागत करून आपले उदरनिर्वाह करून आपल्या पाल्यांना जगवत आहे. तरी ५० ते ५५ वर्षा पेक्षा जास्त कालावधी लोटून सुद्धा आता पर्यंत आम्हाला आमच्या शेतमालकीचे हक्काचे जमीन पट्टे मिळालेले नाही. यामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या कोणताच योजनेचा लाभ घेता येत नाही. शासनाच्या विविध योजनेपासून भूमिहीन शेतकरी वंचित राहत आहे. अतिदुर्गम जिवती पहाडावर कोणतेच उद्योग-धंदे नाहीं मग शेतकऱ्यांनी जगायचे कसे व मुलाबाळांचे भविष्य घडवायचे कसे असाही प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षणसाठी सुद्धा सात बाराची अट सरकारने लादली आहे. त्यामुळे विद्यार्थी आता शिक्षणापासूनही वंचित राहणार कि काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकप्रतिनिधी व पालकमंत्रानी मंत्रीमंडळ बैठकीत हा मुद्दा मांडून कायद्यामध्ये सुधारणा करून भूमिहीन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा या आशयाचे निवेदन पालकमंत्र्यांना देण्यात आले आहे. मागणी पूर्ण न झाल्यास विदर्भ राज्य आंदोलन समिती तीव्र आंदोलन करेल असा इशारा विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडी समितीचे जिल्हाध्यक्ष सुदाम राठोड यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.