Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: 'हेल्पिंग हॅन्ड' संस्थेचा स्तुत्य उपक्रम
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रूग्ण सेवेनंतर आता गरजू महिलेला ताडपत्रीची मदत अनंता गोखरे - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - राजुरा शहरातील हेल्पीग हॅन्ड या महिलांच्या सामाज...

  • रूग्ण सेवेनंतर आता गरजू महिलेला ताडपत्रीची मदत

अनंता गोखरे - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
राजुरा शहरातील हेल्पीग हॅन्ड या महिलांच्या सामाजिक संस्थेने कोरोना काळात शहरातील अनेक गरजू लोकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार मदत केली. याच अनुषंगाने पावसात घर गळून बेजार झालेल्या एका विधवा महिलेला घरावर टाकण्यासाठी ताडपत्री देऊन मदत केली. गरजू लोकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार नियोजनबद्ध मदत करणाऱ्या या सेवाभावी संस्थेच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

सोमनाथपूर वॉर्डात श्रीमती पुष्पा इरकूलवार या महिलेचे झोपडीवजा घर आहे. पावसात तिचे घर पूर्णपणे गळू लागले. मात्र मजुरी करून आपले जीवनयापन करताना गळणाऱ्या घरातच आपल्या लहान मुलीसह ही विधवा महिला राहात होती. याची माहिती हेल्पीग हॅन्ड संस्थेच्या कृतीका सोनटक्के यांना मिळाली. त्यांनी तातडीने आपल्या समूहातील सदस्यांना माहिती दिली. संकटमोचन हनुमान मंदिर प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात श्रीमती ईरकुलवार यांना ही ताडपत्री देण्यात आली. 

या कार्यक्रमात कृतीका सोनटक्के, स्नेहा चांडक, अमृता धोटे, वज्रमाला बदकमवार, सुनिता जमदाडे, रजनी शर्मा, स्वरुपा झंवर, भावना रागीट, संतोष झंवर, लता चांडक, रचना नावंदर, कंचन चांडक, रमा आयटलावार, सीमा कलसे इत्यादी सदस्या उपस्थित होत्या.‌

हेल्पीग हॅन्ड संस्थेने कोरोना काळात अडचणीत असलेल्या अनेक बाधित रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना जेवणाचे डब्बे पुरवून मदत केली. आता शासनाकडून पाठ्य पुस्तकाचा लाभ न मिळणार्‍या गरीब विद्यार्थी - विद्यार्थिनींना पाठ्यपुस्तके व नोटबूक सह शालेय साहित्य वितरित करण्याचा मानस संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top