Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: भयानक हत्याकांड ; एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन आरोपीची आत्महत्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आयशा - आमचा विदर्भ प्रतिनिधी नागपूर - कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन एका व्यक्तीनं गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे....
आयशा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
नागपूर -
कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन एका व्यक्तीनं गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
नागपुरच्या पाचपावली परिसरात ही घटना घडली आहे. आरोपीनं पत्नी, मुलगा, मुलगी यांच्यासह सासू आणि मेहुणीची हत्या केली आहे. सासू आणि मेहुणीची हत्या केल्यानंतर आरोपीनं घरी येऊन गळफास घेत आत्महत्या केली आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
आलोक माथुरकर असं आरोपीचं नाव असून याने त्याची पत्नी विजया, मुलगी परी आणि मुलगा साहिल यांची त्याच्या स्वतःच्या घरात, तर शंभर फुटावर रोडच्या पलीकडे असलेल्या दुसऱ्या घरात सासु लक्ष्मी देविदास बोबडे आणि मेहुणी अमिषा यांची निर्घुण हत्या केली. आरोपीने सासू आणि मेहुणीला गळा चिरून ठार मारले तर पत्नी मुलगी आणि मुलाची डोक्यावर हातोड्याने फटके मारून हत्त्या केली. त्यानंतर त्याने स्वतः गळफास लावून घेतला.
४८ वर्षीय आलोक हा टेलरिंगचे काम करीत होता. गोळीबार चौकात तो भाड्याच्या खोलीत रहात होता. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आलोकचे मेहुणीसोबत प्रेम संबंध होते. त्यामुळे कुटुंबात कलह निर्माण होत होते. यावरून पती- पत्नीमध्ये वाद होत होते. या वादाची परिणिती काल रात्री कडाक्याच्या भांडणात झाली होती. या भांडणाचा राग मनात धरून आलोक रविवारी रात्री जवळच राहणाऱ्या सासू लक्ष्मी यांच्याघरी गेला. तिथे त्याने सासू लक्ष्मी आणि मेहूणी अमिषा यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांना जीवे मारले. त्यानंतर तो रात्री घरी परतला. घरी आल्यानंतर त्याने पत्नी, मुलगा व मुलगी या तिघांना ठार मारले. त्यानंतर सकाळच्या सुमारास आलोकने सोमवारी सकाळी गळफास लावून आत्महत्या केली.
ही घटना पहाटेच्यावेळी घडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, दुपारी १२च्या दरम्यान या घटनेचे वृत्त आगी सारखे शहरात पसरले त्यानंतर उपराजधानीत या भयानक हत्याकांडानं खळबळ उडाली आहे. शेजारच्या लोकांना घरातून आवाज आला नसल्यानं संशय आल्यानंतर त्यांनी आत डोकावून पाहिले असता त्यांना सर्वांचे मृतदेह दिसले. शेजाऱ्यांनी या बाबत तहसील पोलिसांना सूचना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह वरिष्ठ पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top