Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
श्रीकृष्ण सभागृह येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ प्रतिनिधी कोरपना - विकास पुरुष माननीय आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार...

  • श्रीकृष्ण सभागृह येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने

शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
विकास पुरुष माननीय आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार वित्त नियोजन वन तथा पालकमंत्री महाराष्ट्र राज्य, हंसराजजी अहिर केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार,तसेच देवरावभाऊ भोंगळे भाजपा जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर यांच्या सूचनेनुसार आज जागतिक योगा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे बंडुजी मोहितकर सर योग गुरु, किशोरजी बावने जिल्हा सहकार आघाडी प्रमुख, डॉक्टर भास्कर मुसळे, दिवाकर मालेकर योग गुरु, संजयभाऊ मुसळे माझी संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष, रमेश पा मालेकर,  अमोल आसेकर नगरसेवक कोरपना, ओम पवार युवा मोर्चा जिल्हा सचिव, अँड पवन मोहितकर, बालु पाणघाटे आदी मान्यवर उपस्थित होते योग गुरु  बंडुजी मोहित्कर सर यांचा सत्कार नारायण हिवरकर तालुकाध्यक्ष यांच्या हस्ते शाल श्रीफळ मानचिन्ह प्रशस्तीपत्रक देऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते दिवाकर जी मालेकार योग गुरु यांचा सत्कार करण्यात आला  योग गुरु मोहितकर साऱ यांनी योगा बद्दल माहिती दिली व योगा शिकविण्यात आला नारायण हिवरकर तालुका अध्यक्ष यांनी आपल्या मनोगतात योग हा ऋषीमुनी साधू संत यांच्या मार्गदर्शनाखाली फार पूर्वीपासून शिकविले जायचे माननीय पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला संयुक्त राष्ट्राच्या 193 देशांपैकी 175 देशाचे प्रतिनिधी या प्रस्तावाला पाठिंबा दिला म्हणून माननीय प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी यांच्या प्रस्तावानुसार जागतिक योग दिन साजरा करण्यात येतो यामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा सिंहाचा वाटा आहे हा केवळ एक व्यायाम नसून शरीराला निरोगी ठेवण्याचा एक सोपा मार्ग आहे यामुळे हाडे, मांसपेशी,सांधे दणकट राहतात व मनुष्य निरोगी राहतो असे आपल्या मनोगतात बोलून दाखविले तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन किशोरजी बावणे यांनी केले तर आभार ओम पवार युवा मोर्चा जिल्हा महासचिव यांनी मानले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top