Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चंद्रपूर मनपा क्षेत्रातील 'हा भाग" विकासापासून वंचित
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - चंद्रपुर महानगर पालिका क्षेत्रातील झोन क्र.३ च्या हद्दीत येत असलेल्या कोल बंकर बायपास रोड ते स्...

शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
चंद्रपुर महानगर पालिका क्षेत्रातील झोन क्र.३ च्या हद्दीत येत असलेल्या कोल बंकर बायपास रोड ते स्मशानभुमी इंदिरा नगर ह्या रोडचे काम इमरजेंसी फंडातुन त्वरित करण्यात यावे, अन्यथा आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे. तसे निवेदन बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी युवा आघाडी चंद्रपुरच्या वतीने करण्यात महानगर पालिका आयुक्त यांना देण्यात आले आहे. यावेळी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी युवा आघाडी अध्यक्ष महेंद्र झाडे राजु रामटेके, अध्यक्ष चंद्रपुर विधानसभा, धम्मदिप बांबोळे,अमोल जुनघरे, ताजुन सुखदेवे,प्रफुल रामटेके, गिरीश बोंडे, जितेन्द्र लाडे आदींची उपस्थिती होती.
चंद्रपुर शहरातील इंदिरा नगर येथे असलेल्या स्मशानभुमी वर अंत्ययात्रेसाठी बंगाली कम्प, शाम नगर, प्रगति नगर, शंकर नगर, रय्यतवारी या भागातुन लोक येत असतात. मात्र स्मशानभुमी लगत असलेल्या राजीव गांधी नगर येथील नागरिकांना आवागमन करण्यासाठी रस्ताच शिल्लक नाही. कोल बंकर बायपास रोड ते स्मशानभुमी इंदिरा नगर कड़े जाणारा रस्ता हां अतिशय खराब व वाईट परिस्थितीत असल्यामुळे या रस्त्याने साधी दुचाकी किंवा पायी वाट काढणे कठीन झाले आहे.या वार्डात संगीता भोयर,अजय सरकार, जयश्री जुमडे, अमजद अली, हे चार नगरसेवक आहेत.मात्र त्यांचे सुद्धा या रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे.त्यामुळे कोल बंकर बायपास रोड ते स्मशानभुमी इंदिरा नगर चंद्रपुर या रस्त्याचे बांधकाम त्वरित पुर्ण करण्यात यावे व नागरिकाची अनेक वर्षापासुन असलेली समस्या सोडविण्यात यावि.अशी मागणी निवेदनच्या माध्यमातून करण्यात आली.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top