कोरपना -
नारंडा येथील शेतकरी नामदेव कनाके यांनी आपला 13 क्विंटल 50 किलो कापूस दिनांक 13/02/2020 ला सिसिआयला विकला होता सदर कापसाची रक्कम रुपये 73574 सिसीआय कडून चुकीने दुसऱ्याच्या खात्यात जमा झाली व ती रक्कम नामदेव कनाके यांच्या खात्यात जमा न झाल्याने त्यांना मनस्ताप झाला अनेक प्रयत्न करून या ना त्या कारणाने पैसे खात्यात जमा होत नव्हते ही बाब युवा नेते रोशन आस्वले यांना माहिती पडताच संबंधित सेंटर इंचार्ज व बँकेशी चर्चा करून सदर रक्कम शेतकऱ्याला मिळवून दिली.
सदर रक्कम अडचणी च्या काळात आपल्या खात्यात जमा झाल्याने शेतकऱयाला आनंद झाला, शेतकऱ्यांनी युवा नेते रोशन आस्वले, सीसीआयचे अतुल वाघमारे, बँकेचे व्यवस्थापक मंजूर हुसेन यांचे आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.