Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: स्व. अनिल ठाकूरवार यांची जयंती साजरी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वृक्षारोपण व अनाथाश्रमाला सीसीटीव्ही व भेटवस्तू प्रदान अनंता गोखरे - उपसंपादक राजुरा - शेतकरी संघटनेचे नेते, राजुरा नगर पालिकेचे माजी उपाध्य...

  • वृक्षारोपण व अनाथाश्रमाला सीसीटीव्ही व भेटवस्तू प्रदान
अनंता गोखरे - उपसंपादक
राजुरा -
शेतकरी संघटनेचे नेते, राजुरा नगर पालिकेचे माजी उपाध्यक्ष स्व. अनिल ठाकूरवार यांची जयंती स्वामी विवेकानंद अनाथाश्रम येथे ठाकुरवार परिवारा कडून कार्यक्रमाचे आयोजन करून साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे संचालक माजी आमदार अँड. वामनराव चटप, संस्थाध्यक्ष डॉ. भूपाळ पिंपळशेंडे, सचिव अँड. मुरलीधर देवाळकर, संचालक दिनकर डोहे, सुभाष रामगिरवार, डॉ.रेड्डीवार, मारोती येरने, दिलीप डेरकर, भाऊराव बोबडे, मारोती गव्हाणे इत्यादी उपस्थित होते. 

या कार्यक्रमात श्रीमती रजनी अनिल ठाकूरवार यांनी विवेकानंद अनाथाश्रमाला सीसीटीव्ही कॅमेरे भेट म्हणुन दिले. सोबतच विद्यार्थ्यांंना शालेयपयोगी  वस्तू वितरित केल्या. याकार्यक्रमात स्व. अनिल ठाकूरवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मान्यवरांच्या हस्ते पाच झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन भाऊराव बोबडे व आभार प्रदर्शन मारोती गव्हाने यांनी केले. या कार्यक्रमात श्रीमती रजनी ठाकुरवार यांच्यासह नातेवाईक व परिवारातील मित्र मंडळी उपस्थित होती.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top