तसेच नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलविल्याने भर वस्तीत पावसाळ्याचे पाणी शिरते. नांदा शेत शिवारातील जेनेकर यांची शेतजमीन जवळपास १५ वर्षांपूर्वी मुसळे यांनी विकत घेतली होती. मुसळे यांनी ही शेतजमीन घेण्यापूर्वी याच शेत जमिनीतील जवळपास २ एकर जमीन जेनेकर यांनी गुंठे पाडून परिसरातील नागरिकांना विकली. आजमितीला त्याठिकाणी जवळपास ६० कुटुंबांनी आपले पक्के घर बनवून वास्तव्य करीत आहे. जेनेकर यांचे शेतामधून नैसर्गिक नाला आहे. परिसरातील पावसाचे व इतर पाणी याच नाल्यांमधून वाहत जाते. काही दिवसांपूर्वी मुसळे यांनी खरेदी केलेल्या जमिनीला संरक्षण भिंतीचे काम सुरू केले आहे. तसेच नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलविला आहे. यासाठी शासनाची कुठलीही बांधकाम परवानगी घेतली नाही.
मुसळे यांची शेतजमीन ही बिबी गावच्या सीमेलगत असून शिवधुर्याची जागा न सोडताच काम करीत असल्याचे दिसून येते. मुसळे यांनी खरेदी केलेल्या शेतजमिनीतील काही शेतजमीन अकृषक वापरात आहे. जेनेकर यांनी गुंठेवारी करून विकलेली जमीन अकृषक वापरात असून त्याठिकाणी मोठी वस्ती उभी आहे. मुसळे यांच्या शेतजमिनीतील काही जमिन अकृषक वापरात आहे या ठिकाणचे सांडपाणी, पावसाचे पाणी, आवाजाहीचे रस्ते व इतर सोयीसुविधांकरिता मुसळे यांच्याद्वारे करण्यात येत असलेल्या पक्क्या बांधकामामुळे मोठी अडचण निर्माण होऊ होणार आहे. तसेच शिवधुर्याची जागा सोडली नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे. काम तातडीने थांबवून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र अल्ली यांनी केली आहे.
अनिल मुसळे यांना याबद्दल विचारणा केली असता त्यांनी सांगितले की "पोलिस स्टेशन नांदा-फाटा च्या बाजूला माझ्या मालकीची शेती 14-15 वर्षापासून पडीत अवस्थेत होती. आता तिथं मला शेती करायची असल्यामुळे मी माझ्या जागेत पोल गाडून शेतीला तारबंदी करत आहे. नाल्याचे पाणी कुठून ही गेले तरी शेवटी माझ्याच जागेतून जात आहे. मी कोणतेही पाणी अडवले नाही. माझ्याकडे तहसिलदाराकडून मोजणी करून दिलेला नकाशा, सातबारा, नमुना ८ ची प्रत आहे. कुणालाही आक्षेप असल्यास त्यांनी पुन्हा जागा मोजनी करून घ्यावी. कुणाचेही अतिक्रमण झाले असल्यास त्याने त्याचे पुरावे दाखवावे आणि कोणाचेही चुकीचे अतिक्रमण निघाल्यास मी आपले तारबंदी काढण्यास कधीही तयार आहे."
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.