Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: अल्ट्राटेक व्यवस्थापन व कामगारातील वाद आला संपुष्टात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कंपनी व्यवस्थापनाने मृतकाच्या मुलाला प्रशिक्षित करून नोकरी देण्याचे दिले लेखी आश्वासन ADM ऑफिस समोर सात तास मृतदेह ठेऊन झाले होते काल तीव्र ...

  • कंपनी व्यवस्थापनाने मृतकाच्या मुलाला प्रशिक्षित करून नोकरी देण्याचे दिले लेखी आश्वासन
  • ADM ऑफिस समोर सात तास मृतदेह ठेऊन झाले होते काल तीव्र आंदोलन
  • व्यवस्थापन बिल्डिंगच्या गेटवर आंदोलन पोहचल्याने व्यवस्थापन अधिकाऱ्यांचा उडाला होता फज्जा
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
ठेकेदारी कामगार ईश्वर शिलारकर प्लांट मधे कामावर असतांना खाली पडल्यामुळे अपघात ग्रस्त झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या घटनेने आहत संतप्त झालेल्या परिजन आणि कामगार वर्गाने मृतकाच्या परिवारास आर्थिक सहायता व मुलाला स्थायी नोकरी मिळावी ही भूमिका घेत कामगाराचा मृत्यू देह सोबत घेऊन सकाळी १० ते  दुपारी २ वाजेपर्यंत नांदा फाटा मेन गेटवर प्रदर्शन केले होते. 

४ तासाचा बराच वेळ निघूनही व्यवस्थापन द्वारे टाळाटाळीचे प्रयत्न करीत असल्याचे लक्षात येताच कंपनीतील सर्वच कामगार वर्गांनी आपली काम बंद करत एकत्र येऊन मृतदेह थेट प्रशासकीय भवनाच्या चौकटीवर ठेवले. सर्व कामगार वर्गाची एकता व जोरदार प्रदर्शन बघून व्यवस्थापन अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले होते. तीव्र प्रदर्शन हिंसक होऊ नये याची काळजी घेत कामगार युनियनचे अध्यक्ष नरेश बाबू पूगलिया व त्यांच्या युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थ करून कामगार वर्गाला समजूत घालून शांत करण्यासाचे प्रयत्न यशस्वी ठरले. कामगार युनियन चे सर्व पदाधिकारी चर्चा करण्यास प्रशासकीय भवनला जाऊन बसले होते. तणावपूर्ण स्थिती बघता पोलीस प्रशासनाने दंगा नियंत्रक पथक तैनात केले होते. लगेच लागून असलेल्या गेस्ट हाउस मध्ये बैठक बोलावून कामगार नेते, माजी खासदार व अल्ट्राटेक कामगार युनियनचे अध्यक्ष नरेश पुगलिया यांच्या मार्गदर्शनात युनियनचे कार्याध्यक्ष शिवचंद्र काळे, महामंत्री साईनाथ बुच्चे, श्यामसुंदर रेड्डी, मदन सिंग चंदेल, नरेंद्र पांडे, भिवगडे आणि कंपनीच्या वतीने मुख्य अधिकारी युनिट हेड विजय एकरे, कंपनीचे उपाध्यक्ष (पर्सनल) संजय शर्मा, पाठक तसेच राजुरा चे एसडीपीओ पवार साहेब व गडचांदूरचे ठाणेदार गोपाल भारती यांनी चर्चा करून कामगाराच्या परिवाराला न्याय मिळवून दिला. कंपनी व्यवस्थापनाने मृतकाच्या मुलाला प्रशिक्षित करून नोकरी देण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. 

माणुसकीच्या नात्याने सुहानुभूती पूर्वक विचार करून मुलाला नोकरी देण्याचा निर्णय घेतल्याचे कंपनीचे उपाध्यक्ष (पर्सनल) संजय शर्मा यांनी हस्तलिखित पत्रात नमूद केले. हा कामगार संघटनेचा विजय असल्याचे कामगार संघाचे अध्यक्ष शिवचंद्र काळे यांनी म्हटले आहे. या कंपनीत अशी घटना मागील ४०- ४५ वर्षात पहिल्यांदाच पाहिल्याचे म्हटले जात आहे. गरीब मृतक कामगारांच्या हिताचा निर्णय आल्याने कंपनी व्यवस्थापन अधिकारी आणि युनियनचे अधिकाऱ्यांची समजुती व सामजस्यपणाचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top