Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: टक्क्यांचा खेळ नको परीक्षा फी 50% माफ करा - अक्षय डकरे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विद्यार्थ्यांची चक्क ई मेल द्वारे मुख्यमंत्र्याना मागणी विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - गोंडवाना विद्यापीठ ने विद्यार्थांन...

  • विद्यार्थ्यांची चक्क ई मेल द्वारे मुख्यमंत्र्याना मागणी
विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
गोंडवाना विद्यापीठ ने विद्यार्थांना अंशतः दिलासा दिला असून त्यात इंद्रधनुष्य, आव्हान, आविष्कार, विद्यार्थी कल्याण निधी, विद्यार्थी वैद्यकीय शुल्क, विद्यार्थी संघ शुल्क, आपत्ती व्यवस्थापन शुल्क यात 100% माफी दिली असून हा दर नाममात्र आहे. सोबतच ग्रंथालय शुल्क, प्रयोगशाळा शुल्क, पर्यावरण शुल्क मध्ये 50% सवलत दिली आहे. याचे स्वागत करताना परीक्षा शुल्क मध्ये फक्त 10% ची सवलत देणे हे अन्याकारक आहे. परीक्षा शुल्क मध्ये निदान 50% टक्के सूट मिळेल अशी आशा विद्यार्थी करीत होते. मात्र जिथे शुल्क कमी होते ते कमी करण्यात आले जिथे आवश्यकता होती तिथे फक्त 10 टक्क्याची सूट देण्यात आली शिक्षण विभागाने टक्याचा खेळ बंद करून परीक्षा शुल्क मध्ये 50% माफ करावा अशी मागणी बीइंग डिझायर चे अक्षय डकरे, दत्ता पुरोहित, गजू नागपुरे, अंशुल चामलवार, निखिल पटकोटवर, प्रथमेश दानव, रोशन नगराळे यांनी मुख्यमंत्री मा. उद्धवसाहेब ठाकरे, जिल्हाधिकारी चंद्रपूर, खासदार बाळूभाऊ धानोरकर, आमदार सुभाषभाऊ धोटे, आमदार किशोर जोरगेवार व इतर संबंधित विभागांना ईमेल द्वारे मागणी केली आहे. 

बातम्या अधिक आहेत....

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top