Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: खळबळजनक; तरुणाने रिक्षावर केली दगडफेक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षाच्या काचा फोडल्या गेल्या काही दिवसांत अनेक घटना घडल्याचा दावा रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी यवतमाळ - शह...

  • रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षाच्या काचा फोडल्या
  • गेल्या काही दिवसांत अनेक घटना घडल्याचा दावा
रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी
यवतमाळ -

शहरातील नेताजी नगर परिसरात एका तरूणाचे उभ्या असलेल्या रिक्षाच्या काचांची तोडफोड केली. ही घटना गुरूवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास घडली असून या प्रकरणी यवतमाळ शहर पोलिस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे.

शहरातील नेताजी नगर परिसरातील एका युवकाने गुरूवारी मध्यरात्री परिसरात उभ्या असलेल्या रिक्षाच्या काचा फोडल्या. ही बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच एकच खळबळ उडाली होती. या युवकाने अनेक रिक्षांच्या काचा फोडल्याची तक्रार नागरिकांनी सकाळी शहर पोलिसात दिली आहे.

या घटनांमुळे रिक्षाचालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सदर तरूणावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी आरोपी युवकावर कारवाई करत त्याला ताब्यात घेतलं आहे. प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस करत आहे.

दरम्यान, हा युवक रिक्षांच्या काचा का फोडतो, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. मात्र आरोपी युवकाच्या प्रतापामुळे परिसरातील रिक्षाचालकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. सदर तरुण असं कृत्य का करतो, याबाबत पोलिस तपासात अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top