हरिसालच्या वनपरीक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांना वरिष्ठाकडून प्रचंड त्रास होता. या जाचाला कंटाळून त्यांनी २५ मार्चला स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तिने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीत तिने विनोद शिवकुमार, अतिरिक्त प्रधान मुख्यवनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्याविरुद्ध गंभीर आरोप केला. या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त करण्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोघांनाही अटक केली. रेड्डी यांना उच्च न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. पण, शिवकुमार अद्यापही कारागृहात असून त्यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला. या अर्जावर न्या. मनीष पितळे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने यापूर्वी राज्य सरकारला नोटीस बजावली होती. गुरुवारी सरकारी वकिलांनी तपास अधिकाऱ्यांना आरोपींविरुद्ध न्यायदंडाधिकाऱ्यांसमक्ष दोषारोपपत्र दाखल केल्याची माहिती दिली. त्यामुळे शिवकुमार यांचे वकील फिरदोस मिर्झा यांनी अर्ज मागे घेत असून सत्र न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज करणार असल्याचे न्यायालयाला कळवले. न्यायालयानेही अर्ज मागे घेण्याची अनुमती दिली.
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : शिवकुमार यांनी जामीन अर्ज घेतला मागे
नागपूर -
हरिसाल येथील वनपरीक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांनी जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून मागे घेतला. तपास अधिकाऱ्यांनी सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असून परिस्थिती बदलल्यामुळे आता त्यांना जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज करावा लागेल.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.