गडचांदूर -
प्रसिद्ध समाजसेवक डॉ.गिरीधरभाऊ काळे यांच्या सेवेला सलाम म्हणून कोरपना तालुक्यातील मित्रमंडळी दरवर्षी त्यांचा वाढदिवस रक्तदान शिबीराने साजरा करते. रक्तदान शिबीर आयोजन व या चळवळीला प्रोत्साहन जनजागृती बाबत आज जिल्हा सामान्य रुग्णालय व प्रशासनातर्फे जि.प. अध्यक्ष संध्या गुरनुले यांच्या हस्ते या मंडळाचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला पालकमंत्री विजय वडेट्टीवार, आमदार किशोर जोरगेवार, जि.प.अध्यक्ष संध्या गुरनूले, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत आदी उपस्थित होते. समाजसेवक डॉ.गिरीधर काळे मित्रमंडळाचा सदस्य म्हणून बिबि चे रहिवासी शेख हबीब ने हा सन्मान स्विकारला. विशेष म्हणजे शेख हबीब ने आतापर्यंत स्वतः एकूण १२ वेळा रक्तदान केले. सर्व युवा शक्तीने पुढाकार घेऊन आपल्या जीवनात एकदा तरी रक्तदान नक्की करावे आहे आव्हान याप्रसंगी शेख हबीब ने केले.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.