- वंचित बहुजन आघाडी ची मागणी
बल्लारपूर -
बल्लारपूर ते बामणी महामार्ग अत्यंत खराब झाला असून जागोजागी खड्डे पडलेले आहेत.ज्या ठिकाणी महामार्गावर रस्त्याचे कटिंग केलेले आहे तेथे मोठ्या भेगा पडलेल्या असून छोटे-मोठे अपघात त्यामुळे घडत आहेत. रस्त्याच्या बाजूच्या रोड दबलेला असून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. पाईप लाईन मुळे तयार झालेले खड्डे मोठ्या प्रमाणात झाले असून प्रशासन अपघाताची वाट बघत नाही ना असा प्रश्न तयार होतो. सदर महामार्गावरील रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांनी निवेदनाद्वारे केली.
वरील मागणी तात्काळ पूर्ण केली गेली नाही तर वंचित बहुजन आघाडी सदर रस्त्यावरील खड्ड्यात बेशरमाचे झाड लावून प्रशासनाचा जाहीर निषेध करेल असा इशारा वंचित बहुजन आघाडी द्वारे देण्यात आला. निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे नेते राजु झोडे, संपत कोरडे, मंगेश सोणवने, जॉकिर खान ,स्नेहल साखरे, अनिरुप पाटील, प्रदीप झामरे, अखिल शेंडे, तथा वंचित बहुजन आघाडीचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.