चंद्रपूर -
दि. 19 जून : गत 24 तासात जिल्ह्यात 43 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 54 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 1 बाधिताचा जिल्हयात मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार बाधित आलेल्या 54 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 17, चंद्रपूर तालुका 5, बल्लारपूर 11, भद्रावती 1, ब्रम्हपुरी 0 , नागभिड 0, सिंदेवाही 1, मूल 1, सावली 2, पोंभूर्णा 1, गोंडपिपरी 1, राजूरा 3, चिमूर 2, वरोरा 2, कोरपना 7, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत झालेल्यांमध्ये पोभुंर्णा तालुक्यातील 1 महिलेचा समावेश आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 82 हजार 268 झाली आहे. सध्या 733 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 5 लाख 33 हजार 957 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4 लाख 46 हजार 769 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1516 बाधितांचे मृत्यू झाले आहे.
प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.