कार्यक्रमात राहुल गांधी व गांधी घराण्याबाबत देशासाठी बलिदान देणाऱ्या इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या बाबत माहिती देण्यात आली. येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत राहुल गांधी हेच देशाचे पंतप्रधान होतील व भारताला महासत्ता देश म्हणुन ओळखल्या जाईल असे प्रतिपादन तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष विठ्ठलराव थीपे यांनी व्यक्त केली. व्यापारी संघाचे अध्यक्ष हंसराज चौधरी व गटनेता विक्रम येरणे यांनी काँग्रेस पक्षाच्या पुढील उज्ज्वल भविष्या बद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे औचीत्य साधुन गरजू लोकांना धान्य किटचे वाटप करण्यात आले. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष नाना पटोले यांचे नेतृत्वात राज्यात सर्वाधिक जागा मिळवून आणि परत देशात पक्षाला सत्तेत आणून राहुल गांधी यांना पंतप्रधान बनविण्याचा संकल्प उपस्थित सर्वच काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला.
कार्यक्रमास सभापती राहुल उमरे, नगरसेवक पापाय्या पोंनामवार, अरविंद मेश्राम, जयश्रीताई ताकसांडे, माजी शहर अध्यक्ष रोहित शिंगाडे, महिला शहर अध्यक्ष अर्चनाताई आंबेकर, एन एस यु आय तालुका अध्यक्ष प्रीतम सातपुते, युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष अतुल गोरे, राहुल ताकसांडे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते संचालन शहर अध्यक्ष संतोष महाडोळे यांनी तर आभार तालुका युवक काँग्रेस चे अध्यक्ष शैलेश लोखंडे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.