Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जनावरे कोंबून नेणारे दोन ट्रक पोलिसांनी पकडले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ट्रकमधून कत्तलखाण्याकडे जाणारे तब्बल ४८ जनावरांना सोडवले गडचांदुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाल भारती यांची धडक कारवाई 25 लाखाचा मुद्द...

  • ट्रकमधून कत्तलखाण्याकडे जाणारे तब्बल ४८ जनावरांना सोडवले
  • गडचांदुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाल भारती यांची धडक कारवाई
  • 25 लाखाचा मुद्देमाल माल जप्त
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदुर -

चंद्रपूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात जनावरे तेलंगणा आणि आंध्र प्रदेश इथे कत्तलखाण्यात जात असते अशीच जनावरे जात असतांना गडचांदुरचे पोलीस निरीक्षक गोपाल भारती यांनी गोपनिय माहितीच्या आधारे नाकेबंदी करून दोन 6 चाकी ट्रक MH-40BL- 1079 तसेच TS – 07UB-0472 हे ट्रक थांबवुन त्यामध्ये असलेले 26 गायी, 22 बैल (गोरे) असे एकुण 48 गोवंशीय जनावरे अंत्यत निर्दयतेने व कृरतेने वाहनामध्ये कोंबुन भरून कत्तल करण्याचे इरादयाने वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने सदर जनावरांची सुटका करून जनावरांना सुरक्षित पणे श्रीकृष्ण गो शाळा व सेवा संस्था गोंडपिपरी येथे दाखल केले.

पोलीसांनी एकुण 48 जनावरे किमत अंदाजे 5,12,000 रूपये दोन सहा चाकी ट्रक किंमत 20 लक्ष रू. असा एकुण 25 लाख 12 हजार रूपये चा मुद्देमाल जप्त केला. व वाहनामध्ये असलेले चालक सिराज बक्सुदिन पठाण वय 24 वर्ष रा. राजेंद्र नगर जि. रंगारेडडी (तेलगांना), शेख सारीक शेख मुर्रा वय 26 वर्ष रा. गडचांदुर वार्ड क. 43, फारूख खान गफार खान वय 22 वर्ष रा. गडचांदुर वार्ड क. 4, यांना अटक केले तसेच फरार वाहन चालक संजय शंकरराव वालदे रा. कलोडे भवन हिंगणघाट जि. वर्धा यांचे विरूध्द तसेच जनावर मालक ईमारण शेख रा. गडचांदुर असे एकुण पाच आरोपी विरूध्द पोस्टे गडचांदुर येथे अप. क्र. 218/2021 कलम 11 (1) (ड) भारताचा प्राण्यास निर्दयतेने वागविणे प्रतिबंध अधिनियम 1960 सह कलम 5 ( अ ), 5 ( ब ), 9, 11 महाराष्ट्राचा प्राणी संरक्षण अधिनियम 1976 सुधारीत 2015 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top