Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जल प्राधिकरणात कार्यरत बेजबाबदार कर्मचार्‍यावर कारवाई करा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बल्लारपूर आम आदमी पार्टीची मागणी विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी (ग्रामीण) राजुरा - आम आदमी पक्ष बल्लारपूर शहराचे संयोजक रवि...
  • बल्लारपूर आम आदमी पार्टीची मागणी
विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी (ग्रामीण)
राजुरा -
आम आदमी पक्ष बल्लारपूर शहराचे संयोजक रविकुमार पुप्पलवार यांना माहिती मिळाली कि, विद्यानगर वार्ड व विवेकानंद प्रभागातील त्रिशरण बुद्ध विहार जवळ वॉल गळतीमुळे हजारो लिटर पाणी वेगाने वाहत होते. बल्लारपूरचे क्रांतिकारक कार्यकर्ते इरशाद अली यांनी 'आप' चे शहर अध्यक्ष रविकुमार श. पुप्पलवार याना ही बाब लक्षात आणून दिली होती. 
रविकुमार पुप्पलवार यांनी MJP चे अधीक्षक सुशील पाटील यांना फोन करून कळविण्याचा प्रयत्न केला पण ते व्यस्त राहिल्यामुळे पाटील फोन उचलू शकले नाहीत. पुप्पलवार यांनी MJP चे देखरेख विभाग सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना फोन करून  हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाल्याची माहिती दिली पण विभाग सांभाळणाऱ्या बेजबाबदार कर्मचाऱ्याने तक्रार एकूण घेण्याचे सोडून बेजबाबदार पणाने बोलून स्वतः किती उर्मट आहो याचा परिचय दिला. 
बेजबाबदार सरकारी कर्मचार्‍याने शहरातील एका पक्षाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीशी असे वागत, बोलत असेल तर हे कर्मचारी सामान्य नागरिकाशी कसे वागत असेल याची प्रचिती येते. प्रशासनानें या विषयाला गांभीर्याने घेत अवर्तवणूक करणाऱ्या निष्क्रिय कर्मचाऱ्यावर त्वरित कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन आप द्वारा देण्यात आले.
निवेदन देतेवेळी आपचे जिल्हा विधि सलाहगर अँड.किशोर पुसलवार, शहर अध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, उपाध्यक्ष अफजल अली, सचिव अँड.पावन वैरागडे, कोषाध्यक्ष आसिफ हुसेन, संघठण मंत्री निलेश जाधव, अँड.आदित्य खरतड, अवदेश तिवारी, समशेरसिंह चौहान, राकेश वडसकर, इर्शाद अली, आदर्श नारायणदास इत्यादि पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top