Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जखमी वाघावर उपचार करायला जाणाऱ्या पथकावरच वाघाचा हल्ला
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पशुवैद्यकीय अधिकारी रविकांत खोब्रागडे जखमी श्रावण कुमार - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प मधील बफर क्षेत्रातील...

  • पशुवैद्यकीय अधिकारी रविकांत खोब्रागडे जखमी
श्रावण कुमार - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प मधील बफर क्षेत्रातील मुल वनपरिक्षेत्राचे जाणाळा उपक्षेत्रातील डोनी गावाजवळ वनक्षेत्रात एका जखमी वाघाला बेशुद्धावस्थेत आणून उपचार करण्यासाठी गेलेल्या पथकावरच वाघाने हल्ला केला यात पशुवैद्यकीय अधिकारी रविकांत खोब्रागडे यांचे पायाला वाघाने पकडल्याने पायाला गंभीर दुखापत झाली असून थोडक्यात बाचावल्याची घटना आज घडली. 

काल या वनक्षेत्रात दोन वाघाची जोरदार झुंज झाली होती त्यात एक वाघ जखमी झाल्याने त्याच भागात बेशुद्ध अवस्थेत पडून असल्याचे, गावातील नागरिकांनी ही माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली, माहिती मिळताच वरिष्ठ वणाधिकार्याच्या मार्गदर्शनात वनविभागाची चमू व पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे हे डोनी गावात पोहचले. त्या वाघावर वनविभाग मागील 2 ते 3 दिवसापासून पाळत ठेवून होतेच. सदर चमू वाघाजवळ पोहचले असता अचानक वाघाने हल्ला चढविला, अचानक झालेल्या हल्ल्यात सर्व सैरावैरा पळू लागले, पळताना डॉ. रविकांत खोब्रागडे हे खाली पडले, वाघाने डॉ. खोब्रागडे यांच्यावर हल्ला चढविला आणि त्यांचा एक पाय जबड्यात पकडले असता झटका देऊन सुटका करताच दुसरा पाय वाघाने पकडले त्यामुळे

दुसऱ्या पायाला गंभीर इजा झाली. सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी आरडाओरडा केल्यावर वाघ पळून गेला. जखमी डॉ. रविकांत खोब्रागडे यांना शहरातील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सध्या वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे. 







Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top