- गुरांची योग्य सोयी-सुविधा न केल्यामुळे सलग दुसरी घटना....
- गावकऱ्यांचा परिसरतील नागरिकांचा ग्रामपंचायत वर रोष....
- फक्त जबर दंड थोपटण्यासाठीच गुरे कोंबतात का....?
सावली तालुक्यातील सोनापूर ग्रामपंचायतच्या कोंडवाड्यामध्ये सोनापूर च्या एका शेतकऱ्यांनी दहा ते पंधरा दिवसापूर्वी बाहेर गावातील मात्र रस्ता भटकंती झालेल्या चार म्हशी ग्रामपंचायतच्या कोंडवाड्यात टाकल्या होत्या या कोंडवाड्यात टाकण्यात आलेल्या चार म्हशी पैकी एक आज मृत्यू पावली असून दुसरी म्हश शेवटची घंटा मोजत आहे व तेही मरण्याच्या तारणीत आहे.
या ग्रामपंचायत च्या कोंडवाड्यात अशीच घटना पंधरा दिवसाच्या पहिलेच एका म्हशी चा मृत्यू ने झाले असतानासुद्धा आता परत त्याचीच पुनरावृत्ती झाली. यापूर्वी म्हस कोंडवाड्यात मेली असतानासुद्धा ग्रामपंचायतने कोंडवाड्यात ठेवलेल्या जनावरांची योग्य काळजी घेणे गरजेचे होते. परंतु ग्रामपंचायत ने काळजी न घेतल्यामुळे आणि दुर्लक्ष केल्याने म्हशी चे मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी बाब समोर अली आहे. सदर म्हशीच्या मृत्यूचे कारण गुलदस्त्यात असून पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना सोनापूर येथील कोंडवाड्यात पाचारण करण्यात आले असून म्हशीच्या उत्तरीय तपासणी नंतरच खरे कारण समोर येणार आहे. मात्र ग्रामपंचायत ने कोंडवाड्यात साठवलेल्या गोरे ढोरांना योग्य वेळेस चारा-पाणी आणि गुरांची सोय केली असती तर कदाचित हा प्रकार घडला नसता असे गावकरी बोलत आहेत. मृत गुरांची उत्तरीय तपासणी करण्यात आली यावेळी सिंदेवाही वरून डॉ. सुरपाम, डॉ. हरीणखेडे, डॉ. वनकर व चमू उपस्थित होती. मृत्यू चे कारण मृत्यू अहवाल आल्यानंतरच कळेल असे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.
ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे मुक्या जनावरांचा जीव जात असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून ग्रामपंचायत प्रशासनाप्रति नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. मात्र या दुर्दैवी घटनेचे जवाबदार कोण असा प्रश्न नागरिक विचारात आहे.
आम्ही दररोज गुरांना योग्य चारा पाणी देत होतो परंतु नेमका गुरांना कोणता आजार व मृत्यू कसे झाले असावे हे उत्तरीय तपासानंतरच कळेल. यात ग्रामपंचायत प्रशासनाचा कोणताही दोष नाही.मुकेश भुरसे, उपसरपंचग्रामपंचायत प्रशासनाचा दुर्लक्षितपणा आणि निष्काळजीपना समोर दिसून आला असून महिन्याभरात या कोंडवाड्यातील सलग दुसरी घटना असून सदर घटनेची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी.किशोर देशमुख, ग्रामस्थ
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.