Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सलून व्यवसायीकांनी मानले फेडरेशन ऑफ ट्रेड कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे आभार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सलून व्यवसायीकांकरिता दिले होते प्रशासनाने कडक बंदचे आदेश शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - सलून व्यवसायीकांकरिता प्रशासनाने कडक ...

  • सलून व्यवसायीकांकरिता दिले होते प्रशासनाने कडक बंदचे आदेश
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
सलून व्यवसायीकांकरिता प्रशासनाने कडक बंदचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने सलून व्यवसायीकांच्या शिष्टमंडळाने फेडरेशन ऑफ ट्रेड कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष राम किशोर सारडा यांची भेट घेऊन त्यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. प्रशासनाने यावर पाठपुरावा करत रविवारी सलून व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी दिली. फेडरेशन ऑफ ट्रेड कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष राम किशोर सारडा यांच्या प्रयत्नामुळे मुभा मिळाल्यामुळे ७०० सलून व्यावसायिक असलेल्या सलून असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी फेडरेशन ऑफ ट्रेड कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष राम किशोर सारडा यांची भेट घेत त्यांना पुष्पगुच्छ देत आभार व्यक्त केले. सलून व्यावसायिकांनी सोमवारी सलून व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. यावेळी मुन्ना चांडक, चिराग नथवानी, मनीष राजा, न्हावी व सलून अससोसिएशनचे महेश आंबेकर, अमर वाटेकर, ज्ञानेश्वर वाटेकर, रोहित कडुकर, संतोष नॅप्पित, रवि येसेकर, प्रणीत वाटेकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या अधिक आहेत.....

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top