Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: ग्रामपंचायत जवळील बार व देशी दारूचे दुकान दुसरीकडे हटवा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चुनाळा येथील महिलांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन तात्काळ निर्णय घ्या अन्यथा आंदोलन अनंता गोखरे - आमचा विदर्भ राजुरा - तालुक्यातील सर्वात मोठी ...

  • चुनाळा येथील महिलांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
  • तात्काळ निर्णय घ्या अन्यथा आंदोलन
अनंता गोखरे - आमचा विदर्भ
राजुरा -
तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या चुनाळा येथील ग्रामपंचायत, बसस्थानक, बँक लगत असलेले बिअर बार व देशी दारूची दुकान शासनाच्या दारू बंदी हटविण्याच्या निर्णयानुसार त्याच ठिकाणी सुरु होत असल्याने याचा चुनाळा वासीयांना मोठा त्रास होणार आहेे यामुळे येथील शेकडो महिलांनी या ठिकाणाला विरोध करीत दुसऱ्या जागेवर हटविण्याची मागणी निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे जिल्हाधिकारी मार्फत केली असून तात्काळ निर्णय न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ पासून दारू बंदी करण्यात आली यामुळे चुनाळा येथील प्रवेशद्वारा समोरील विहीरगाव-धोनोरा मार्गावर असलेल्या ग्रामपंचायत, बँक, इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह, तिरुपती बालाजी मंदिर, बसस्थानक लगत बिअर बार आणि देशी दारूचे दुकान आहे. पाच वर्षे दारूबंदीमुळे या परिसरात शांतता व सुव्यवस्था होती. मात्र दारू बंदी उठल्याने या ठिकाणी दारूची दुकान सुरु होत असल्यामुळे महिला व लहान बालकांपासून वयोवृद्ध नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागणार असल्याने व रहदारीचे ठिकाण असल्यामुळे या दुकानांचा मनस्ताप सर्वांनाच सहन करावा लागणार आहे. भविष्यात दारू पिऊन गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून बँक, ग्रामपंचायत, पोस्ट ऑफिस, बसस्थानक, सहकारी सेवा संस्था येथे ये-जा करणाऱ्या नागरिकासोबत अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अश्या प्रकारावर आळा घालण्यासाठी येथील दुकान दुसरीकडे हलविणे गरजेचे आहे.

सदर दुकाने ही चुनाळा गावाच्या प्रवेश द्वारासमोर विहीरगाव-धानोरा राज्य मार्गाच्या वळणावर आहे. दारू दुकानासमोर गर्दी राहत असल्याने वळण रस्तावर समोरील वाहन ये-जा करीत असताना दिसत नसल्याने या अगोदर बरेचदा अपघाताच्या घटना घडल्या आहे. विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी बसची वाट पाहत बसस्थानकावर उभे असतात यामुळे या ठिकाणी दारू दुकान सुरु करणे धोक्याचे असून अपघाताला आमंत्रण देणारे आहे. तेव्हा तात्काळ या ठिकाणावरून बिअर बार व देशी दारूची दुकाने दुसऱ्या ठिकाणी हलविण्याची मागणी चुनाळा येथील शेकडो महिलांनी स्वाक्षरीचे निवेदन राजुरा तहसीलदार हरीश गाडे यांच्याकडे देत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले असून बिअर बार व देशी दारूच्या दुकानाचे ठिकाण न  बद्दलविल्यास संपूर्ण महिलांनी आंदोलनाचा पवित्र घेतला आहे. यावेळी निवेदन देताना चुनाळा येथील लक्ष्मी दुर्गे, सुनीता किरमिरवार, निर्मला कार्लेकर, वर्षा रागीट, वंदना रागीट, इंदू गौरकार, पुष्पा तेलंग, स्वाती तेलंग, मीना कार्लेकर, संगीता रागीट उपस्थित होत्या.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top