Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गोवंश तस्करी करणारी ९ जणांची टोळी जेरबंद, पोलिसांची धडक कारवाई
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
छत्तीसगडवरून महाराष्ट्र मार्गे तेलंगाणा राज्यात गोवंश तस्करी आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स गडचिरोली - गोवंश तस्करी करून कत्तलीसाठी तेलंगणा ...

  • छत्तीसगडवरून महाराष्ट्र मार्गे तेलंगाणा राज्यात गोवंश तस्करी

आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
गडचिरोली -
गोवंश तस्करी करून कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात घेऊन जाणारे 30 जनावरे आणि नऊ जणांची टोळी जेरबंद करण्यात उपविभागीय पोलिस अधिकारी, अहेरीच्या चमूला यश आले आहे. नुकतेच रुजू झालेले अमोल ठाकूर यांची अहेरी परिसरात धडक कारवाई सुरू असून आज 10:30 वाजताच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे गोवंश तस्करीचे तीन वाहन पाठलाग करून पकडले आहे.

मागील अनेक दिवसांपासून छत्तीसगडवरून महाराष्ट्र मार्गे तेलंगाणा राज्यात गोवंश तस्करी सुरू आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी कारभार हाती घेतल्यावर या भागात सुरू असलेले अवैद्य धंद्यांना रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज गोवंश तस्करी करणाऱ्या तीन वाहन पकडून 30 गोवंश जनावरांची सुटका तब्बल नऊ जणांच्या टोळीला जेरबंद केले आहे.

ही कारवाई आष्टी-आलापल्ली मार्गावरील चौडमपल्ली येथे वाहनांमध्ये तीन चारचाकी वाहन जप्त करण्यात आले असून 30 गोवंश जनावरांना गोंडपिपरी येथील गोशाळेत पाठवण्यात आले आहे. एकूण जप्त केलेल्या मालाची किंमत 30 लाख रुपये असल्याची माहिती समोर येत आहे. ही कारवाई अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर आणि त्यांच्या चमूने केली आहे. पुढील कारवाई ते स्वतः करीत आहेत. सदर कारवाईमुळे गोधन तस्करीला आळा बसणार असून तस्करी करणाऱ्यामध्ये भीती निर्माण झाली आहे.

छत्तीसगड राज्यातून आष्टी मार्गे तेलंगाना राज्यात गो तस्करी होत असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे गोवंशाचे तस्करी करणाऱ्या वाहनाचा अष्टीवरून पाठलाग करीत चौडमपल्ली येथे पकडण्यात आली आहे. तीन चारचाकी वाहन जप्त केले असून तब्बल 30 गोवंश जनावरांची सुटका करून त्यांना गोंडपिपरी येथील गो शाळेत पाठवण्यात आले आहे. जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत अंदाजे 30 लाख रुपये आहे. एकूण 9 तस्करांना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top