गडचांदुर -
महाराष्टाचे माजी वित्त नियोजन मंत्री तथा बल्लारपूर क्षेत्राचे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार व माजी केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज भैय्या अहीर जिल्हा भाजपच्या सुचनेनुसार आज गडचांदुर येथे युवा भाजपाचे वतीने बालाजी सेलीब्रेशन मध्ये योग दिन साजरा करून योग शिक्षक श्री हलदार किनव, श्रीमती सत्यभामा वरारकर यांचे प्रमाणपत्र शाल, श्रीफळ, शिल्ड सॅनिटायझर व मास्क देवुन सत्कार करण्यात आला. व जागतीक योग दिनी योगा चे महत्व सांगून उपस्थितांकडून योगाचे प्रात्यक्षिक करून घेतले याप्रसंगी भाजपाचे शहर अधक्ष सतीश उपलेंचवार यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात योगाबद्दलचे महत्व काय व योग दिवस साजरा केव्हा पासुन साजरा केला जात आहे याबद्दल सविस्तर माहीती दिली तर आभार प्रदर्शन भाजपचे युवा नेते श्री निलेश ताजने यांनी केले.
यावेळी भाजप शहर अधक्ष सतीश उपलेंचवार, युवा नेते निलेश ताजने, नगरसेवक अरविंद डोहे, जेष्ट नेते शिवाजी सेलोकर, हरीश घोरे, अरविंद कोरे, उद्धव पुरी, विनोद कावडकर ,सुनील जोगी, संजय भुजाडे युवा कार्यकर्ता प्रतीक सदनपवार, अजीम बेग, तुषार देवकर, सुयोग कोंगरे, कुणाल पारखी, इमरान पाशा शेख, रीतिक बारसागडे, रीतिक ताजने, वैभव राव, कृष्णा वायकर माजी सभापती हरिभाऊ मोरे, कृष्णाजी भागवत त्याच बरोबर महिला कार्यकर्ता सौ. विजयालक्ष्मी डोहे, सौ .रंजनाताई मडावी, सौ. सपना शेलोकर आदी ची उपस्थिती होती

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.