Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: धक्कादायक! 'मी चोर नाही...' असं लिहीत चालकाने ट्रकमध्येच गळफास घेऊन केली आत्महत्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ट्रक चालकाची आत्महत्या ; मी चोर नाही, असं म्हणत संपवलं जीवन पोलिसांनी गुन्हा नोंद केल्यानंतर उचललं टोकाचं पाऊल? आयशा - आमचा विदर्भ प्रतिनिधी...
  • ट्रक चालकाची आत्महत्या ; मी चोर नाही, असं म्हणत संपवलं जीवन
  • पोलिसांनी गुन्हा नोंद केल्यानंतर उचललं टोकाचं पाऊल?
आयशा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
नागपूर -
सोयाबीन तेल घेऊन मुंबईला जाणाऱ्या ट्रकमधील १६० बॉक्स चोरी केल्याचा आरोप करण्यात आल्याने ट्रकचालकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. जीवन संपवत असताना या ट्रकचालकाने हातावर ‘मै चोर नही हूँ’ असं लिहून ट्रकच्या केबिनला तारेने गळफास लावत आत्महत्या केली. अशोक जितूलाल नागोत्रा असं गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या ट्रक चालकाचं नाव आहे. या घटनेमुळे ट्रकमधील तेलाच्या बॉक्स चोरी प्रकरणासह पोलिसांच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
नागोत्रा हे सोयाबीन तेलाची खोकी घेऊन ९ जून रोजी सावनेरहून ट्रक क्र. एम.एच. ०४-जी.आर.२७७४ मुंबईकडे निघाले होते. रात्री १२.३०च्या सुमारास ते अमरावती मार्गावरील कोंढाळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बाजारगाव येथील पेट्रोल पंपावर थांबले. १० जून रोजी सकाळी सातच्या सुमारास झोपेतून उठल्यानंतर ट्रकची ताडपत्री फाडली गेल्याचे त्यांना दिसले. चोरीच्या या घटनेची तक्रार त्यांनी कोंढाळी पोलिस ठाण्यात केली.
कोंढाळीचे ठाणेदार प्रफुल्ल फुल्लरवार यांनी चौकशी केली असता प्रथम दर्शनी अशोक नागोत्रा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला गेला. या ट्रकमधील मालाचे मोजमाप करायचे असल्याने हा ट्रक पोलिस ठाण्याच्या आवारातच उभा होता. मंगळवारी सकाळी अशोक नागोत्रा यांचा मृतदेह ट्रकच्या केबिनबाहेर गळफास लावलेल्या स्थितीत लटकताना आढळून आला. आत्महत्येपूर्वी त्यांनी हाता पायावर ‘मै चोर नही हूँ’ असं लिहिलेलं आढळून आलं आहे.
चालकाने आत्महत्या केल्याने पोलिसांच्या कारवाईवरही आता प्रश्नचिन्ह लागले आहे. पोलिसांनी कोणतीही चौकशी न करता गुन्हा दाखल केला का, की कोणाच्या दबावाखाली कारवाई केली, अशी शंका आता व्यक्त केली जात आहे.

न्यायाधीश, एपीच्या उपस्थितीत पंचनामा
माहिती मिळताच पोलिस अधीक्षक ओला यांनी घटनास्थळ गाठले़. पोलिसांनी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून नागोत्रा यांचा पंचनामा काटोल न्यायालयाच्या न्यायाधीश निलिमा पेठे व काटोलचे तहसीलदार अजय चरडे, तलाठी निलेश कदम, तलाठी गिरीश कोहळे व राकेश पिंपळकर, पत्नी व मुलासमोर केला. याप्रकरणाचा पुढील तपास सावनेरचे उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक सरंबळकर हे करत आहेत.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top