Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: दहा वर्षांपासून ८१४ प्रकल्पग्रस्त शेतकरी मोबदला व नौकरीच्या प्रतिक्षेत
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वेकोलि धोपटाला युजी टू ओसी प्रोजेक्ट अनंता - गोखरे - आमचा विदर्भ उपसंपादक राजुरा - वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या धोपटाळ...

  • वेकोलि धोपटाला युजी टू ओसी प्रोजेक्ट

अनंता - गोखरे - आमचा विदर्भ उपसंपादक
राजुरा -
वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या धोपटाळा युजी टू ओसी या नव्या प्रोजेक्ट मधील ८१४ शेतकरी मागील दहा वर्षांपासून न्याय हक्कासाठी लढा देत आहे.पण आजतागत त्यांना जमिनीच्या मोबदलासह नौकरी मिळालेली नाही. त्यामुळे त्यांच्यात मोठा असंतोष पसरला आहे.दरम्यान प्रकल्पग्रस्त शेतकरी विजय चन्ने यांनी मुख्य महाप्रबंधक मनोज कुमार यांची भेट घेऊन या प्रोजेक्टचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा २९ जून नंतर कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा दिला आहे. वेकोलीच्या धोपटाळा युजी टू ओसी या नव्या कोळसा खाणी करीता ८७२.२७ हेक्टर शेत जमीन अधिग्रहित केली आहे.यात कोलगाव, सास्ती,भाडंगपूर,मनोली,माथरा आदी गावातील ८१४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. प्रकल्पग्रस्त शेतकरी मागील दहा वर्षांपासून जमिनीचा मोबदला व नौकरी मिळावी याकरीता संघर्ष करीत आहे.पण अजुन पावेतो त्यांना न्याय मिळालेला नाही.त्यातच शेत जमिनीवर अधिग्रहण संबंधित विविध सेक्शन लागल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्येला सामोरे जावे लागत आहे. मधल्या काळात पीडित शेतकऱ्यांनी वेकोली प्रशासनाचे लक्ष वेधण्या करीता आंदोलने केली पण वेकोली व्यवस्थापन कोळसा घेणाऱ्या एजन्सी मिळत नसल्याचे कारण पुढे करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.वेकोली प्रशासनाच्या या चालढकल धोरणामुळे शेतकऱ्यांत मोठा असंतोष पसरला आहे. दरम्यान पीडित प्रकल्पग्रस्त विजय चन्ने यांनी दोन दिवसा अगोदर मुख्य महाप्रबंधक मनोजकुमार यांची भेट घेऊन चर्चा केली व प्रश्न मार्गी लावण्याबाबत निवेदन दिले.येत्या काही दिवसात या संदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले असे चन्ने यांनी म्हटले. प्रशासनाने २९ जून पर्यन्त मोबदला व नौकरीचा प्रश्न निकाली काढावा अन्यथा खाणीतुन निघणाऱ्या कोळशाची वाहतूक रोखू असा इशारा विजय चन्ने यांनी दिला आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top