- भाजपला बदनाम करण्यासाठी काॅग्रेसच्या स्थानिक नेत्याने आखले षडयंत्र
- भाजपचे नगरसेवक संजय कंचर्लावार यांचा आरोप
चंद्रपूर महापालिकेच्या एप्रिल २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने ३६ जागा जिंकून स्पष्ट बहुमत घेऊन सत्ता स्थापन केली. मागील ४ वर्षांपासून जनहिताची कामे सुरु आहेत. अनेक महत्त्वपूर्ण निर्णय झाले. कोरोनाच्या काळात माणुसकी दाखवून मदतीचा हात दिला. सामाजिक बांधिलकी जोपासून उपक्रम राबविले. भविष्यांत येणाऱ्या कोरोनाच्या लाटेला थोपवून धरण्यासाठी भाजप सत्ताधारी प्रयत्न करीत आहेत. म्हणूनच जनतेचा कौल भाजपच्या बाजूने आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीत पराभव दिसत असल्याने नैराश्यात गेलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सर्वत्र घोटाळेच दिसू लागले आहेत. म्हणूनच भाजपच्या नगरसेवकांच्या नावे स्वतःच्या कार्यकर्त्याना पाठवून प्रदेशाध्यक्षाची दिशाभूल करण्यात आली.
नाना पटोले यांच्या भेटीदरम्यानच्या प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रात केवळ काँग्रेसचेच कार्यकर्ते दिसत आहेत. मग, त्यात भाजपचा एकही चेहरा का दिसत नाही. त्यांचेकडे कोणी लेखी निवेदन दिले आहे व कोणत्या तारखेस दिलेले आहे, हे सुद्धा नमूद केलेले नाही. हवेत आरोप करून भाजपच्या नगरसेवकांना बदनाम करणाऱ्या काँग्रेस शहर अध्यक्षांनी स्वतःच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाची दिशाभूल करू नये. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवून भाजपच्या नगरसेवकांची जाणीवपूर्वक बदनामी करीत आहेत. हा प्रकार जाणीवपूर्वक राजकीय हेतू साध्य करण्याच्या व जनतेची दिशाभूल करण्याच्या वाईट हेतूने, भाजप पक्षाची व नगरसेवकांची बदनामी करणारा आहे.
या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी, यासाठी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. कोणतीही तक्रार नैराश्यातून केली जात नाही तर ती न्याय मिळविण्यासाठी आणि सत्य उघड करण्यासाठी केली जाते, हे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ध्यानात घेतले पहिजे. आता सत्य उघड होऊन जनतेसमोर पोलखोल होईल, या भीतीने काँग्रेसच्या शहरनेत्याने पत्रकबाजी सुरु केली आहे. आगामी काळात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत पराभव दिसत असल्याने काँग्रेस कार्यकर्तेच नैराश्यात आहेत, अशी टीकादेखील नगरसेवक संजय कंचर्लावार यांनी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.