Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: निधन वार्ता - उद्धव निखाडे गडचांदूर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर येथील सेवानिवृत्त शिक्षक, अत्यंत सुस्वभावी, मनमिळावू , क...

धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर येथील सेवानिवृत्त शिक्षक, अत्यंत सुस्वभावी, मनमिळावू , कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित, मराठा सेवा संघाचे सक्रिय कार्यकर्ते उद्धव मारुती निखाडे वय ६१ यांचे अल्पशा आजाराने दि. १६-६-२१ ला पहाटे ५ वाजता नागपूर येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात सुविद्य पत्नी (शिक्षिका) मुलगा, मुलगी, भाऊ बहिणी, जावई, नातवंडे तथा बराच मोठा आप्तपरिवार आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top