- सिटी पोलीस स्टेशन मध्ये ठाणेदारांनी व्यापाऱ्यांशी साधला संवाद
चंद्रपूर -
जिल्ह्यात ७ जून पासून अनलॉक करण्यात आला आहे. जिल्ह्यात सर्व प्रकारचे व्यवहार हे सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास सवलत देण्यात आली आहे. सध्यातरी जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव कमी असला तरी काळजी न घेतल्यास कोरोनाचा पुन्हा उद्रेक होऊ शकतो यासाठी सिटी पोलीस स्टेशन मध्ये ठाणेदारांनी अंबोरे साहेबानी सोमवारी सायंकाळी पोलीस स्टेशनचा आवारात व्यापाऱ्यांशी साधला संवाद साधला.
ठाणेदार अंबोरे यांनी सांगितले कि, व्यापाऱ्यांनी व्यापारतर करावा सोबतच कोरोना पासून स्वतःचे, स्वतःच्या कुटुंबाचे व आपल्या ग्राहकांचे कसे रक्षण करता येईल याचीसुद्धा काळजी घ्यावी. व्यापाऱ्यांनी आस्थापनात मास्क, सोशल डिस्टेंसिंग व शासनाद्वारे सांगितलेल्या कोरोना नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे. व्यापाऱ्यांनी बिगर मास्क घातलेल्या व्यक्तींना आस्थापनात प्रवेश नाकारावा. गर्दी नियंत्रणात आणण्याकरिता गोल बाजार व गंज वॉर्ड भाजी मंडीत पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली असता लवकरच गस्त वाढवत असल्याचे ठाणेदार साहेबांनी सांगितले. सोबतच भाजी मंडीतील विक्रेत्यांनी व ग्राहकांनी सोशल डिस्टेंसिंग चे पालन करण्याची सूचनाही देण्यात आली. यावेळी रामकिशोर सारडा, अरविंद सोनी, महेंद्रा सादरानी, दिनेश बजाज, राकेश टहलीयानी, महेश उपाध्याय, चंदू उमाटे, चिराग नथवानी, शशी ठक्कर, अनिल टहलियानी, रामजीवन परमार व इतर व्यापारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.