Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: २५० बॅग बोगस बियाणे जप्त
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पाटण पोलिसांची कारवाई धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - शेतकऱ्यांच्या खरिप हंगामाला सुरुवात झाली असून शेतकरी पेरणीच्या काम...
  • पाटण पोलिसांची कारवाई
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
शेतकऱ्यांच्या खरिप हंगामाला सुरुवात झाली असून शेतकरी पेरणीच्या कामाला लागले आहेत, त्यातच काही संधीसाधू व्यापारी व दलालांनी अनाधिकृत बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारुन लाखो रुपयांची माया गोळा करण्याचा गोरखधंदा सुरु केला आहे.
पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पुनागुडा गावाजवळ पोलीसांनी गोपणीय माहितीच्या आधारे सापळा रचुन झायलो गाडी क्र.एमएच ३४  एए २१५१ मधुन बिल्ला नामक लेबल असलेले १०० बॅग, काव्या १००़़, राघवन ५० अशा एकूण २५० बॅग जप्त करण्यात आले असून वाहन चालक प्रकाश गोपीचंद चव्हाण ( ३८ ) राहणार डोंगरगाव तहसिल राजूरा याला अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाही पोलिस उपनिरिक्षक निलम डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरिक्षक जमिल शेख, रमाकांत कामळी, गुंडेराव पोले, परमविर खोबरे, निखिल ठाकरे प्रमेश्वर गडदे, सुरज जांभुळे यांनी केली. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top